ती चारित्र्यहीन आहे, तिला लाजलज्जा नाही, पडद्यावर चुंबन घेते; मल्लिकाने सांगीतला बाॅलीवूडचा खतरनाक अनुभव

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री मल्लिका शेरावत बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. इंडस्ट्रीमध्ये ती तिच्या बोल्ड आणि मादक अदांसाठी ओळखली जाते. नुकताच तिने देश सोडण्याबाबतचा खुलासा केला आहे. बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत मल्लिका म्हणाली की, अस पाऊल उचलण्यास मला भाग पाडले गेले. माध्यमांच्या एका भागाने तिला चरित्र्यहीन स्त्री म्हणून समजले. तिच्या मते, ज्यांनी तिला चरित्र्यहीन म्हटले त्यापैकी बहुतेक महिला होत्या.

ती म्हणाली, “लोक मला जज करायचे. ते म्हणायचे की तिच्यामध्ये लाजलज्जा नाही. ती एक चरित्र्यहीन स्त्री आहे. ती कोणत्या प्रकारची दृश्ये करते ते पहा. बिकिनी घालते. पडद्यावर चुंबने घेते.

मल्लिकाने पुढे सांगितले की तिच्या सोबत जे काही घडले तो फक्त एक अनुभव आहे आणि ती खूप आनंदी आहे की आता समाजाने खूप प्रगती केली आहे. नग्न दृश्यांबद्दल लोक अधिक सहनशील झाले आहेत. आजकाल अशी दृश्ये करणे वादग्रस्त गोष्ट नाही.

“मीडियाच्या एका भागाने मला त्रास दिला. यात बहुतांश महिलांचा सहभाग होता.त्यामुळे मी खूप अस्वस्थ झाली. पुरुषांना माझ्याशी कधीही समस्या आली नाही. त्यांनी नेहमीच माझे कौतुक केले. या महिला माझ्या विरोधात का आहेत हे मला समजले नाही.

या मुलाखतीत तिने आणखी काही खुलासे केले, मल्लिका शेरावतला तिच्या वडिलांनी अभिनेत्री होण्यास नकार दिला यामध्येच तिने तिच्या वडिलांचे आडनाव न लावता तिच्या आईचे आडनाव लावले. तिचे तिच्या वडिलांसोबत अनेकवेळा भांडणही झाले. वडिलांचा नकार असतानाही स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती मुंबईला गेली.

मल्लिकाने याबद्दल बॉलिवूड बबलला सांगितले की, वडिलांच्या विरोधात ती पहिल्यांदाच गेली. तिचे वडील म्हणायचे की, चित्रपटात जाऊन कुटुंबाचे नाव खराब होईल. एकदा तिच्या वडिलांनी असेही म्हटले की “मी मल्लिकाला आपली मुलगी मानत नाही”. यानंतरच मल्लिकाने तिच्या वडिलांचे आडनाव तिच्या नावापुढे न लावण्याचा निर्णय घेतला.

मल्लिका शेवटची RK/RKAY या चित्रपटात दिसली होती. आता ती नकाब नावाच्या शो ची तयारी करत आहे. या शोमध्ये तिच्यासोबत अभिनेत्री ईशा गुप्ताही काम करणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या
“पांढरे केस का लपवत नाहीस?”; वडिलांच्या प्रश्नावर समीरा रेड्डीने दिलं भन्नाट उत्तर, म्हणाली…
मुस्लिम कुटुंबाच्या घरी दरवर्षी येतो बाप्पा! बाप्पामुळेच पुत्ररत्न लाभल्याचा रेहमानचा दावा
“हिंदू जगातील सर्वात सभ्य व सहीष्णू बहुसंख्याक, हिंदूस्थान कधीच अफगाणिस्तान होणार नाही”
अभिनेता अजय देवगण सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडणार; बनवणार ‘बाहुबली’पेक्षा मोठ्या बजेटचा चित्रपट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.