घटस्फोटाच्या आदल्या रात्री मलायकासोबत ह्या धक्कादायक गोष्टी घडल्या होत्या

अनेकदा लग्न झाल्यानंतर घटस्फोट होतो आणि नवरा बायको वेगळे होतात. त्यामुळे घटस्फोट झाल्यानंतर किंवा घटस्फोट घेताना खुप विचार करावा लागतो. असेच काही बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरासोबतही झाले होते.

मलायकाने १९९८ मध्ये सलमान खानचा भाऊ अरबाझ खानसोबत लग्न केले होते. लग्ना अगोदर अनेक वर्षे हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. पण २०१७ मध्ये या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या १९ वर्षांनंतर या दोघांनी घटस्फोट घेतला आणि हे दोघे वेगळे झाले.

आपल्या घटस्फोटाबद्दल मलायकाने करीना कपूरच्या ‘व्हॉट वूमन वॉन्ट’ या शोमध्ये अनेक खुलासे केले आहेत. तिच्या घटस्फोटामूळे तिच्या आयुष्यावर काय परिणाम झाला. या गोष्टीचा खुलासा केला. त्यासोबतच घटस्फोटाबद्दल तिच्या कुटुंबाचे काय मत होते. हे देखील तिने सांगितले.

मलायका म्हणाली की, ‘ज्या दिवशी कोर्टात घटस्फोटावर सुनावणी होती. त्याच्या आदल्या दिवशी घरातील वातावरण खुप तणावपूर्ण होते. घरातील लोक टेन्शनमध्ये होते. त्यांनी मला अनेक सल्ले दिले. त्यांना माझी काळजी आहे’.

ती म्हणाली की, घरातील लोक माझ्या जवळ बसले होते. ते मला सल्ला देत होते. पहिला सल्ला म्हणजे असे करू नको. आपल्या निर्णयाचा परत एकदा विचार कर. तु जे काही करशील ते काळजीपूर्वक कर. तुझा निर्णय तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे’.

ती पुढे म्हणाली की, ‘असे एकदा नाही. अनेकदा झाले. मी खुप दिवसांपासून ही गोष्ट ऐकत होते. पण सर्वात चांगला सल्ला म्हणजे तु तुझा निर्णय घे. आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत. काळजी करू नको. हा सल्ला मला ताकत देतो’.

आपण लग्नानंतर आपल्या पतीसोबत आनंदी नसतो. तेव्हा ते नाते संपवायला हवे. आपण आपल्या स्वाभिमानासाठी आणि सन्मानासाठी जे काही करू शकतो. ते करायला हवे. ते नाते सोडून पुढे जायला हवे. घटस्फोटानंतर परत एकदा प्रेमात पडायला हवे’.

घटस्फोटानंतरच्या आयुष्याबद्दल बोलताना मलायका म्हणाली की, मला पहिल्यांदा स्वतंत्र्याची जाणीव झाली. आपण नवीन लोकांना भेटतो. अंथरूणावर एकटे झोपतो. या सर्व गोष्टी आपल्याला रिफ्रेश करतात. आपल्याला परत एकदा स्वतः ला संधी देता येते’. असे देखील मलायका अरोरा म्हणाली.

घटस्फोटानंतर मलायकाच्या आयुष्यात अनेक बदल झाले आहेत. ते सर्व बदल मलायका एन्जॉय करत आहे. तिच्या मते अरबाज खानसोबत घटस्फोट घेणे. हा तिच्या आयुष्यातील खुप चांगला निर्णय होता.

अरबाज आणि मलायकाला १५ वर्षांचा मुलगा आहे. घटस्फोटानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तर अरबाज खान देखील विदेशी गर्लफ्रेंड जॉर्जियासोबत लिव्ह इनमध्ये राहत आहे. या दोघांचा घटस्फोटाचा समावेश बॉलीवूडच्या सर्वात महागड्या घटस्फोटांमध्ये होतो.

महत्त्वाच्या बातम्या –

त्या दिवशी करण जोहरने मीडियासमोर गोविंदाची जाहीर माफी मागितली होती; असं काय घडलं होतं?

एखाद्या चित्रपटाच्या फिल्मी स्टोरीप्रमाणे ‘या’ अभिनेत्याचे कुटुंब एका रात्रीत संपले

एखाद्या चित्रपटाच्या फिल्मी स्टोरीप्रमाणे ‘या’ अभिनेत्याचे कुटुंब एका रात्रीत संपले

सुशांतची सुसाईड नोट नव्हती; माझ्या बापाच्या सुसाईड नोटमध्ये अर्णबचे नाव असूनही कारवाई नाही केली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.