मलायकाचं वय, घटस्फोट आणि मुलाबाबत व्यक्त झाला अर्जुन कपूर, नात्याबद्दल खुलासा करताना म्हणाला…

मुंबई । बॉलीवूडमधील अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर गेल्या काही वर्षांपासून एकत्र दिसतात. बॉलिवूडच लोकप्रिय कपल म्हणून त्यांना ओळखले जाते. मात्र मलायकासोबतच्या रिलेशनबाबत अर्जुन नेहमी बोलणे टाळतो. त्यांच्या रिलेशनबाबत चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. दोघांच्या नात्याबाबत नेहमी चर्चा रंगताना दिसून येतात.

अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर मलायका अर्जुनला डेट करत आहे. दोघांमध्ये वयाचं मोठं अंतर आहे. मलायका एका मुलाची आई आहे. असं असले तरी या गोष्टी त्यांच्या प्रेमाच्या आड येत नाहीत. अर्जुन कपूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याच कारण स्पष्ट केले आहे.

अर्जुनला तुझं मलायका सोबत काय नात आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना अर्जुन म्हणाला, मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कधीच चर्चा करत नाही. कारण मला असे वाटते की तुम्ही तुमच्या जोडीदाराचा आदर केला पाहिजे. प्रत्येकाचा भूतकाळ हा असतो.

अर्जुन पुढे म्हणतो, मी आमच्या दोघांमध्ये एक आदरयुक्त सीमा ठेवली आहे. मलायकाला ज्या गोष्टींमुळे आनंद मिळेल अशा गोष्टी करण्याचा मी प्रयत्न करतो. माझ्या रिलेशनशीपचा माझ्या करिअरवर परिणाम होऊ देणार नाही.

तसेच मी आमच्या नात्याचा आदर करतो. दोघे एकमेकांना वेळ देत आहोत. या सर्वाचा मुलावर काय परिणाम होतो हे मला माहित आहे. त्यामुळे काही गोष्टी खाजगी ठेवणे आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या-
खलनायक रणजितच्या प्रेमात पागल झाली होती अभिनेत्री सिंपल कपाडिया; राजेश खन्नामूळे केले ब्रेकअप
मी माझ्या वडिलांचा आदर करतो, पण त्यांनी दुसरे लग्न करुन योग्य केले असे मी म्हणणार नाही, कारण…- अर्जून कपुर
१६० किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने जात होती बुलेट ट्रेन, ड्रायव्हर चालू ट्रेन सोडून गेला टॉयलेटला…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.