तुमच्या लाडक्या बाप्पासाठी यावर्षी स्पेशल ड्रायफ्रूट्सचे मोदक बनवा; जाणून घ्या साहित्य आणि कृती

टिम काथ्याकूट – आज गणेश चतुर्थी आहे. आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन आज होणार आहे. आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाला मोदक खुप प्रिय आहेत. फक्त प्रसाद म्हणूनच नाही तर मोदक महाराष्ट्रातील लोकप्रिय प्रसिद्ध गोड पदार्थ आहे.

मोदक हा बाप्पांचा लाडका प्रसाद आहे. आपण बाप्पाला मोदक प्रसाद म्हणून ठेवतो. पण या वर्षी या मोदकात काहीतरी वेगळे बनवूया.

आपण नेहमी प्रसादासाठी उकडीचे मोदक बनवत असतो. पण यावेळेस ड्राई फ्रूट्स नक्की ट्राय करा. कारण ते आरोग्यासाठी देखील तेवढेच फायदेशीर असतात आणि सर्वांना खुपच आवडतात.

ड्राई फ्रूट्स मोदक हे सर्व ड्राई फ्रूट्सपासून बनवले जातात. महत्त्वाचे म्हणजे हे मोदक बनवणे खुपच सोपे असते. चला तर मग जाणून घेऊया ड्राई फ्रूट्समोदक कसे बनवतात.

ड्राई फ्रूट्स मोदक बनवण्यासाठी आवश्यक साहित्य :-
१)अंजीर – ६
२)खजूर – ८
३)बदाम – १५-२०
४)अखरोट – ७-८
५)शेंगदाणे -११-१५
६)पिस्ता – ६-७
७)काजू – ९-१०
८)मनुके – १०-१५
९)तिळ – १ छोटा चमचा
१०)चारोळ्या – १ छोटा चमचा
११)खसखस – १ छोटा चमचा
१२)सुखलेलं नारळ – १ छोटा चमचा खिसलेलं नारळ
१३)तुप – १ मोठा चमचा
१४)इलायची पाउडर – २ चमचा

ड्राई फ्रूट्स मोदक बनवण्याची कृती:-
१)सर्वात पहिले अंजीर आणि खजूरला दोन तासांसाठी पाण्यात भिजू घाला.
२)त्यानंतर बदाम,पिस्ता, आखरोड,चारोळ्या आणि काजूला मिक्सरमधून बारीक करून घ्या.
३)शेंगदाणे थोडा वेळ भाजून घ्या आणि ते मिक्सरमधून बारीक करून घ्या.

४)भिजू घातलेले अंजीर आणि खजूरपण मिक्सरमधून बारीक करून घ्या.
५)एका कढईत सुखलेलं नारळ आणि खसखस खरपूस भाजून घ्या.
६) नारळ आणि खसखस भाजून झाल्यानंतर काढून ठेवा आणि त्या कढईत तुप टाकून खजूर आणि अंजीरचे मिश्रण चांगले भाजून घ्या.

७)अंजीर आणि खजूरमध्ये बारीक केलेले सर्व ड्राई फ्रूट्स टाकून थोडा वेळ परतून घ्या.
८)हे सर्व साहित्य लालसर झाल्यानंतर त्यात नारळ आणि विलायची पावडर टाका. व्यवस्थित लालसर भाजून घ्या.

९)हे मिश्रण तयार आहे. आत्ता याचे सुंदर मोदक तयार करून घ्या.
१०)मोदक करण्यासाठी मोदकाचा साचा वापरा म्हणजे मोदक अजूनच आकर्षित दिसतील.

हे तयार झालेले सुंदर आणि आरोग्यदायी मोदक बाप्पाला द्या व तुम्हीही खा. रहे मोदक तुमच्या आरोग्यासाठी खुपच फायदेशीर आहेत. त्यामूळे एकदा तरी नक्कीच ट्राय करा.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.