‘या’ वेबसाईटवर १ रुपयाची नोट लाखोंच्या किंमतीने विकली जाते, जाणून घ्या कशी विकायची?

सणासुदीच्या काळात जर तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्हाला लखपती होण्याची संधी स्वतः चालून आली आहे. त्यासाठी तुम्हाला काहीही करण्याची गरज नाहीये. जर तुमच्याकडे १ रुपयांची नोट असेल तर तुम्ही सहज एक लाख रुपये कमवू शकता.

फक्त तुम्हाला या खास नोटेचा फोटो एका वेबसाईटवर ठेवावा लागेल. त्यानंतर लोक तुमच्या नोटेला घेण्यासाठी बोली लावतील. मग ही नोट तुम्ही कोणालाही विकून लखपती होऊ शकता. त्यासाठी ही पूर्ण बातमी वाचा. या नोटेचा औक्षणमध्ये तुम्ही एक लाख रुपयांपर्यंत कमवू शकता. याशिवाय तुम्ही मोलभाव देखील करू शकता.

इंडियामार्ट या वेबसाईटवर या नोटा विकल्या जातात. किंवा एखाद्या कंपनीच्या साईटला जाऊन तुम्ही या नोटा विकू शकता. या नोटेची कहाणी अशी आहे की, हे रिझर्व्ह बँक नाही तर भारत सरकार जारी करते. यामुळे भारतीय रिझर्व बँकेच्या गव्हर्नरने रुपयाच्या नोटवर सही केलेली नाही.

या नोटवर देशाच्या अर्थसचिवाच्या नावाची स्वाक्षरी आहे. एक रुपयांची पहिली नोट १ नोव्हेंबर १९१७ ला छापली गेली होती. या नोटवर किंग जॉर्ज पंचमचा फोटो होता. १९२६ मध्ये ही नोट बंद झाली. १९४० मध्ये पुन्हा हिची निर्मिती करण्यात आली. १९९४ मध्ये पुन्हा या नोटेचे मुद्रण थांबण्यात आले.

ई-कॉमर्सच्या वेबसाईटवर तुम्ही अशा जुन्या नोटा किंवा नाणी विकू शकता. तुमच्याकडे वैष्णोदेवीचे चित्र असलेले १० ची किंवा ५ ची नाणी असली तर तुम्ही ही नाणी या वेबसाईटवर विकू शकता. कारण काही लोक या नाण्यांना खूप भाग्यवान मानतात.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.