उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त 

बारामती । बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी येथे राज्य उत्पादन शुल्क पथकाने आज सोमवारी छापा टाकला. यामध्ये सुमारे ६२ लाख ७१० रुपयांचा स्पिरिटचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी सुख नाम दिलज्योत सिंग (पाली.राजस्थान, सध्या राहणार कुतवळ वस्ती, बारामती) या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक यांना मिळालेल्या माहिती मिळाली होती.

याप्रकरणी रंगीला ढाब्याच्या आवारात टँकर लावून आरोपी वाहन चालक सुखनाम सिंग हा टँकर मधील
अतिशुद्ध मद्यार्क चोरून त्याची विक्री करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे उत्पादन शुल्कच्या पथकाने धाब्यावर छापा टाकला.

या भरारी पथकाने १६ चाकी टँकर सह सुमारे चाळीस हजार लिटर अतिशुद्ध मद्यार्क (स्पिरिट) प्लॅस्टिक कॅन, पाईप असा एकूण तब्बल ६२ लाख ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई प्रसाद सुर्वे, विभागीय भरारी उप-आयुक्त, संतोष झगडे अधीक्षक, संजय जाधव, संजय पाटील उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

कारवाईमध्ये अनिल बिराजदार, विजय मनाळे, विकास थोरात, सतीश इंगळे, प्रशांत दांंहिजे, सर्वश्री पडवळ, बी.आर.सावंत, विजय विंचुरकर, अशोक पाटील, मनिषा भोसले, केशव वामणे, अभिजीत रिसोलेकर हे सहभागी झाले होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.