सौंदर्याला वयात तोलता येत नाही हे खरे! सलमानच्या हिरोईनने ५२ व्या वर्षी केला बिकीनी शूट

‘मैने प्यार किया’ चित्रपटात सलमान खानसोबत रातोरात स्टार बनलेली अभिनेत्री भाग्यश्री आता 52 वर्षांची आहे, पण आजही हॉटनेस, स्टाईल आणि फिटनेसच्या बाबतीत ती बॉलिवूडच्या नवीन अभिनेत्रींना टक्कर देते. अलीकडेच तिने स्वतःचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोंमध्ये लोकांनाही तिच्या वयावर विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. या फोटोजमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. अभिनेत्री भाग्यश्री ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करते.

या फोटोजमध्ये भाग्यश्री सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. तिने अनेक फोटोज आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये तिने जांभळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. ही बिकिनी मोनॉकिनी स्टाइलची असून भाग्यश्री पूलमध्ये तिच्या मैत्रिणींसोबत मस्ती करताना दिसत आहे.

काही फोटोमध्ये भाग्यश्री तलावाच्या बाहेर पोज देत आहे. भाग्यश्रीचे हे फोटोज पाहून तिच्या चाहत्यांनी तिची तुलना सारा आली खान, जान्हवी कपूर यांच्या सौंदर्यासोबत केली आहे.

यावेळी नेटकऱ्यांनी तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काही जणांनी तिला अजूनही तरुण दिसत आहे अशी कमेंट केली तर काहींनी तीच्या फिटनेसला घेऊन कमेंट केली आहे. भाग्यश्री वयाच्या १९ वर्षी उद्योगपती हिमालय दासानी यांच्या सोबत लग्न बंधनात अडकली.

तिच्या आई वडिलांचा या लग्नास नकार होता त्यामुळे ते दोघेही तिच्या लग्नात उपस्थित राहिले नाही. २००९ मध्ये तिने “झलक दिखलाजा” रियालिटी शो मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता ती आपल्या पतीसोबत “श्रीनिर्वेश एन्टरटेन्मेंट” कंपनीही चालवते.

 

महत्वाच्या बातम्या
मीना कुमारीला दारू आणि तंबाखूचे होते जबर व्यसन, या व्यसनामुळेच गेला गेला होता तिचा जीव
मनोज पाटीलच्या आत्महत्येला जबाबदार साहील खानच्या मुसक्या आवळल्या; मनसेने दिली होती धमकी
उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा हाहाकार, राज्यात शाळा महाविद्यालये बंद; योगी सरकारचे आदेश

वाढदिवस विशेष: जेव्हा मगरीला घरी घेऊन आले होते मोदी, वाचा मोदींबद्दल १० न ऐकलेल्या गोष्टी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.