नवीन लग्न झालेल्या भाग्यश्रीच्या नवऱ्याला शिव्या देत होते लोकं; कारण ऐकून धक्का बसेल

‘मैने प्यार किया’ चित्रपटाला तीस वर्ष पुर्ण झाली आहेत. पण तरीही हा चित्रपट नव्यसारखाच वाटतो. चित्रपटाला एवढी वर्ष पुर्ण झाली. तरी चित्रपटाचे आजही लाखो दिवाने आहेत.

१९८९ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने लोकांना वेडं लावले होते. चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. चित्रपटात सलमान आणि भाग्यश्रीची जोडी दिसली होती. या जोडीने सर्वांना वेडं लावलं होते. आजही दोघांच्या जोडीचे लाखो दिवाने आहेत.

चित्रपट सुपरहिट झाला होता. पहील्या चित्रपटानंतर भाग्यश्री आणि सलमान स्टार झाले होते. त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. सलमान अनेक चित्रपट साईन करत होता. तर भाग्यश्री मात्र चित्रपटांपासून लांब गेली होती.

चित्रपट रिलीज होण्याच्या काही महिन्यांपूर्वीच भाग्यश्रीने बॉयफ्रेंड हिमालय दासानीसोबत पळून जाऊन लग्न केले होते. त्यामूळे ती खुप जास्त चर्चेत आली होती. तिच्या लग्नाच्या निर्णयाने चाहत्यांची मने दुखावली होती.

भाग्यश्रीने मात्र कोणाचाही विचार न करता प्रेमाला निवडले आणि लग्न केले. चित्रपट रिलीज झाल्यानंतर सर्वजण भाग्यश्रीबद्दल विचारत होते. लोकांना भाग्यश्रीला अजून चित्रपटांमध्ये पाहायचे होते. पण ती कोणाताही चित्रपट साईन करायला तयार नव्हती.

रातोरात स्टार झालेली भाग्यश्री लग्नामूळे परत एकदा चर्चेत आली होती. नवीन चित्रपट साईन करण्यापूर्वी तिने निर्मात्यांसमोर अट ठेवली होती की, ती यापुढील सर्व चित्रपट तिच्या नवऱ्यासोबत करणार आहे. त्यामूळे अनेकांना धक्का बसला होता.

भाग्यश्रीने नवऱ्यासोबत काही चित्रपट केले. पण ते बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. भाग्यश्रीने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, त्यांचे नवीन लग्न झाले त्यावेळी लोकं त्यांना शुभेच्छा न देता शिव्या द्यायचे. शेवटी कंटाळून दोघांनी फिल्म इंडस्ट्री सोडली.

असे बोलले जाते की, भाग्यश्रीच्या नवऱ्यासोबत काम करण्याच्या अटीमुळे तिचे करिअर खराब झाले होते. कारण लोकांना तिची आणि सलमान खानची जोडी बघायची इच्छा होती. अशा परिस्थितीमध्ये तिने नवऱ्यासोबत काम केले आणि करिअर खराब करून घेतले.

महत्त्वाच्या बातम्या –

पलंगावर झोपल्यामूळे मिथून चक्रवर्तीची झाली होती धुलाई; वाचा पुर्ण किस्सा

दिलबर गर्ल नोरा फतेहीचा नवीन लुक; फोटो पाहून चाहते झाले आनंदी

काका ऋषी कपूरसोबत रोमान्स करण्याचा हट्ट करून बसली होती करिश्मा; त्यांनी दिला ‘हा’ सल्ला

बापरे! टेलिव्हिजनवरील सर्वात महागडा कॉमेडीयन आहे कपिल शर्मा; जाणून घ्या एकूण प्रॉपर्टी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.