आज कुठे आहे ‘मैने प्यार किया’ चित्रपटातील गुलबिया? माहिती ऐकून धक्का बसेल

१९८९ मध्ये रिलीज झालेला ‘मैने प्यार किया’ चित्रपट सर्वांना पाहीलाच असेल. हा चित्रपट खुप मोठा हिट झाला होता. चित्रपटात काम करुन सलमान आणि भाग्यश्री रातोरात स्टार झाले होते. एकाच चित्रपटामूळे दोघांचे नशीब बदलून गेले होते. बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेला हा चित्रपट आजही लोकांना खुप आवडतो.

सलमान आणि भाग्यश्रीच नाही तर मैने प्यार किया चित्रपटात काम करणारा प्रत्येक कलाकार स्टार बनला होता. रिमा लागू, अलोक नाथ, लक्ष्मीकांत बैर्डे, दिलीप जोशीसारखे कलाकार प्रसिद्ध झाले होते. एवढेच नाही तर चित्रपटात कामवाल्या बाईची भुमिका निभावणारी अभिनेत्री देखील रातोरात स्टार बनली होती.

चित्रपटात दुधवाली गुलबियाची भुमिका साकारणारी अभिनेत्री हुमा खान देखील खुप प्रसिद्ध झाली होती. फक्त मैने प्यार किया नाही तर तिने सलमानच्या ‘हम साथ साथ है’ चित्रपटात देखील काम केले होते. या चित्रपटात तिने अलोक नाथच्या सैक्रेटरीची भुमिका निभावली होती.

दोन्ही चित्रपटांमूळे हुमा खान चांगलीच प्रसिद्ध झाली होती. पण आज मात्र ती लाइमलाईटपासून दुर राहून आयूष्य जगत आहे. हुमाचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला होता. सुरुवातीच्या दिवसांमध्ये हुमा पाकिस्तानी चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम करत होती. पण त्यानंतर वयाच्या १७ व्या वर्षी हुमा आईसोबत भारतात आली.

हुमाने बॉलीवूडच्या काही मोजक्या चित्रपटांमध्ये काम केले होते. सलमानसोबत तिने अनिल कपूर आणि अमृता सिंगच्या चमेली की शादी चित्रपटात काम केले होते. पण मुख्य अभिनेत्री म्हणून हुमाला काम मिळू शकले नाही. त्यानंतर तिने बी ग्रेड आणि हॉरर चित्रपटांमध्ये काम केले.

८० च्या दशकातील अनेक हॉरर चित्रपटांमध्ये हुमाने काम केले आहे. ८० आणि ९० च्या दशकामध्ये हुमाने २० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. पण तिचे करिअर जास्त काळ टिकू शकले नाही. थोड्या वेळातच ती चित्रपटांपासून दुर झाली होती.

काही वर्षांपूर्वी हुमाबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली होती. ज्यामूळे सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. हुमावर १२ वर्षांच्या मुलीचे अपहरण करणे आणि तिच्या अत्याचार केल्याचे आरोप लागले होते. या प्रकरणात हुमावर गुन्हा दाखल झाला होता आणि ती अटक करण्यात आली होती.

त्यानंतर हुमाला तीन वर्षांची शिक्षा झाली होती. या घटनेनंतर हुमा पुर्णपणे इंडस्ट्रीतून गायब झाली होती. आज ती कुठे आहे आणि काय करते याबद्दल कोणालाही कल्पना नाही. ती दुसऱ्या कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. आज की गुमनामीचे आयूष्य जगत आहे.

महत्वाच्या बातम्या –
अमेरिकन टॉम अल्टरचा जन्म झाला होता भारतात; चित्रपटांमध्ये विदेशी खलनायक बनून अभिनेत्यांना दिला त्रास
करिश्माचा मोठा खुलासा म्हणाली, करिनापेक्षा सलमान माझ्याशी जास्त….
बॉलीवूडच्या पार्टीमध्ये जाताना स्वत:ची खास दारु सोबत घेऊन जायचे शो मॅन राज कपूर
‘गदर’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा खुलासा म्हणाले, ‘आम्ही छोटे होतो म्हणून कलाकार गदर चित्रपटाला द्यायचे नकार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.