“मोदीजी १५ लाखांसाठी ७ वर्षापासून वाट पाहतोय, तुम्ही ३० मिनीटे वाट पाहू शकत नाही”

सध्या तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये वाद पेटला आहे. पंतप्रधान मोदींनी यास वादळाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती. त्या बैठकीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मुख्य सचिव अलप्पन बंदोपाध्याय हे तीस मिनिटे उशीरा पोहोचले होते.

यानंतर एकच वाद दोन पक्षांमध्ये पेटला आहे. तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी मोदींना टोला लगावला आहे. त्यांनी ट्वीट करत मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीट केले आहे की, तीन मिनिटे उशीर झाला म्हणून काय झाले.

पंधरा लाख रूपये आमच्या खात्यावर जमा होतील म्हणून आम्ही भारतीय ७ वर्षांपासून वाट पाहत आहोत. आम्ही एटीएमच्या बाहेर, कधी लसीकरणाच्या रांगेत उभे आहोत, तुम्हीही कधी कधी वाट पाहत जा, असा टोला त्यांनी लगावला आहे.

वादळाने झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी पश्चिम बंगालच्या दौऱ्यवर गेलेल्या पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अर्धा तास वाट पाहायला लावली. त्या आल्या पण त्यांनी पंतप्रधान मोदींना फक्त पाच मिनिटे दिली.

नुकसानीचे निवेदन पंतप्रधान मोदींकडे दिले आणि त्या लगेच निघून गेल्या. तेथील मुख्य सचिव त्या बैठकीत सादरीकरण करणार होते. मात्र त्यांनाही हाताला ओढून त्या घेऊन गेल्या. या सगळ्या घटनेमुळे नवीन वाद पेटला आहे.

कारण नरेंद्र मोदींना तीस मिनीटे वाट पाहायला लावणे पश्चिम बंगालच्या सचिवांना चांगलेच महागात पडले आहे आणि त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांनी केंद्रिय प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले आहे. पंतप्रधान यायच्या आधी मुख्यमंत्री उपस्थित असणे आवश्यक असताना त्याच्याविरोधात कृती ममता यांनी केली.

मुख्य सचिव आणि त्या अर्धा तास उशिरा आल्या. त्यामुळे भाजपने ममता दीदी व बंदोपाध्याय यांच्यावर कडाडून टीका केली आहे. बंदोपाध्याय यांना ३१ मे रोजी नॉर्थ ब्लॉक कर्मचारी प्रशिक्षण विभागात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारने त्यांना बदलीचे पत्र दिले आहे.

महत्वाच्या बातम्या
सुशांतच्या पुण्यातिथी आधी अली गोनीने शेअर केलेली भावुक पोस्ट व्हायरल, म्हणाला..
निलेश लंकेंच्या कामाचे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले कौतुक, म्हणाले…
मोठी बातमी! आयपीएल पुन्हा होणार, वर्ल्डकपबाबत लवकर निर्णय, बीसीसीआयची मोठी घोषणा
‘बाहुबली’तलं माहिष्मती साम्राज्य काल्पनिक नाही, याठिकाणी आहे खऱ्या अस्तित्वाची नोंद

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.