Share

‘रविवारी शाळेला सुट्टी असते ओ मोदी साहेब, कधी शाळेत गेले असते तर माहीत असतं’

Pm-Modi-1.

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) रविवारी पुणे(Pune) दौऱ्यावर आले होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी पुणे मेट्रोसह विविध विकासकामांचे उद्धघाटन केले. पुणे मेट्रोचं उदघाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी तिकीट काढून मेट्रोचा प्रवास देखील केला. पंतप्रधान मोदींनी आनंदनगर(Anandnagar) ते गरवारे कॉलेज स्टेशनपर्यंत मेट्रोचा प्रवास केला. यावेळी पंतप्रधान मोदींनी मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या शाळेच्या विद्यार्थ्यांशी देखील सवांद साधला.(mahrashtra congress tweet on pm modi metro journey)

पण यावरून पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका होत आहे. ‘रविवारी शाळेला सुट्टी असते मोदीसाहेब’ अशा आशयाचे मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रविवार असताना देखील मुले शाळेला का जात आहेत? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावरून पंतप्रधान मोदींना सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जात आहे.

रविवारी पंतप्रधान मोदींनी पुणे मेट्रोचं उदघाटन केल्यानंतर त्यामधून प्रवास देखील केला. या प्रवासात पंतप्रधान मोदींनी काही विद्यार्थ्यांशी सवांद साधला. या विद्यार्थ्यांनी शाळेचा गणवेश परिधान केला होता. पंतप्रधानांचे या विद्यार्थ्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर सुट्टीच्या दिवशी ही मुले शाळेला का जात आहेत?असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

पुणे दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदींचा ताफा ज्या मार्गावरून जाणार होता, त्या मार्गातील सर्व दुकाने आणि हॉटेल्स दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. एकीकडे शाळा सुरु नसताना रविवारी मुलांना शाळेत पाठवलं जातं आणि दुसरीकडे त्यांच्या पालकांची दुकाने दुपारपर्यंत बंद करायला लावली जातात, अशी टीका सध्या केली जात आहे.

यावर महाराष्ट्र काँग्रेसने एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये महाराष्ट्र काँग्रेसने म्हंटल आहे की, “रविवारी शाळेला सुट्टी असते ओ मोदी साहेब (कधी शाळेत गेले असते तर माहीत असतं) तुमच्या प्रसिद्धी साठी पोरांना कशाला त्रास देत आहात?”, अशा मिश्कील शब्दांत महाराष्ट्र काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मोहसीन शेख यांनी या प्रकरणी प्रश्न उपस्थित करताना भाजपवर टीका केली आहे. “पुणे भाजपा बावचळली आहे का? का पंतप्रधान मोदींना वेड्यात काढायचं ठरवलं आहे? रविवारी कोणती शाळा सुरु असते मुरलीधर भाऊ? असा सवाल मोहसीन शेख यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना केला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
“आज पुण्याच्या आधी मुंबई मेट्रो सुरू झाली असती पण पिता पुत्राच्या अहंकाराने हे होऊन दिले नाही”
बाळासाहेबांनंतर हिंदूह्रदयसम्राट पदवी फडणवीसांना द्यावी, भाजपाची मागणी, शिवसेनेच्या भूमिकेकडे राज्याच लक्ष
श्रीलंकन खेळाडू दमलेत, डाव घोषित करा; द्विशतकाचा विचार न करता जड्डूने दाखवलं ‘Spirit Of Cricket’

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now