५० तरूणांशी लग्न करून पळून जाणाऱ्या महीलेला पकडले; संपूर्ण टोळीच्याही मुसक्या आवळल्या

पुणे | तरूणांशी विवाह करून त्यांच्यासोबत काही दिवस राहून  रोख रक्कम आणि दागिने घेऊन पसार होणार्‍या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीतील ९ महिला आणि २ पुरूषांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी आतापर्यंत ५० पेक्षा अधिक तरूणांशी खोटे लग्न केल्याचं समोर आलं आहे.

 

सविस्तर माहितीनुसार पुण्याजवळील मावळ परिसरातील ३२ वर्षीय तरूणाची या टोळीतील महिलेने फसवणूक केली होती. त्याने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती.  पोलिसांनी बारकाईने तपास करून या टोळीची मुख्य सुत्रधार ज्योती रविंद्र पाटील (वय.३५. रा. वाघोली) या महिलेला ताब्यात घेतले.

 

पोलिसांनी तिच्याकडे कसून चौकशी केली असता  तिने सांगितले की,  महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक राज्यातील तरूणांशी लग्न करून त्यांच्या जवळील दागिने, पैसे घेऊन फसवणूक केली आहे . लग्न करून दोन तीन दिवस लग्न झालेल्या व्यक्ती सोबत राहिल्यानंतर माहेरी जाऊन येते असं खोटं सांगून  विवाह करू इच्छित तरूणांना गंडा घालत असे.

 

फसवणूक झालेले कुटूंब समाजात नाव खराब होईल या भीतीमुळे तकार करण्यास पुढे येत नव्हते. याचाच फायदा या टोळीला होत असत. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत ५० पेक्षा जास्त कुटुंबाची फसवणूक केली आहे.  या टोळीकडून लाखो रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

 

सध्या लगीनसराई सूरू आहे. त्यामुळे लग्न जमत नसलेले तरूण ज्योती पाटील हिला लाखो रूपये देऊन लग्नासाठी मुलगी पहायला लावत. ती याचाच फायदा घेत तिच्या टोळीतील महिलेशी लग्न लावून देत आणि त्यानंतर घरातील मौल्यवान वस्तू, सोन्या चांदीचे दागिने, कपडे घेऊन पळून जात असे. दरम्यान पोलिसांनी अशा प्रकारे फसवणूक झालेल्यांनी जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
नीट बोलायचं असतं, चंद्रकांत पाटलांची गोपीचंद पडळकर यांना जाहीर समज…
प्रेमाच्या आठवड्यात त्यानं मृत्यूला कवटाळलं; प्रेयसीबद्दल चिठ्ठीत लिहिल्या धक्कादायक गोष्टी
आररर खतरनाक! व्हॅलेंटाइन्सला बॉयफ्रेंडने दिला धोका, मग काय गर्लफ्रेंडने घातला शहरात धिंगाणा

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.