मुंबई | आज बाजारात अनेक इलेक्ट्रॉनिक कार ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. कार खरेदी करण्याच्या बाबतीत ग्राहक गोंधळलेले असतात. पण आता खात्रीची कंपनी महिंद्राने eKUV 100 ही कार बाजार आणली आहे. ही गाडी ग्राहकांना उत्तम सुविधा आणि आकर्षक लूकमध्ये उपलब्ध होणार आहे.
इलेक्ट्रिक कार खरेदी करावी की नको हा प्रश्न अनेकांच्या मनात येत असतो. तर आता जास्त विचार करण्याची गरज नाही. कारण दमदार आणि उत्कृष्ट असे उत्पादन या कारच्या निमित्ताने ग्राहकांना मिळणार आहे. भारतातील ग्राहकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढता कल लक्षात घेऊन महिंद्रा कंपनीने ऑटो एक्सपो २०२० मध्ये या कारची ओळख करुन दिली आहे.
दरम्यान, या कारचे बजेट ग्राहकांच्या खिशाला परवडणारे आहे. ekuv 100 ही कार 8.20 लाखात आपल्या घरी येऊ शकते. या कारचे सर्वात खास आकर्षण म्हणजे ही गाडी महिंद्रा KUV 100 सारखीच आहे. यामुळे लूकच्या बाबतीत या कारवर तीळमात्र शंका नाही.
इलेक्ट्रिक कारसाठी सर्वात महत्त्वाचे बॅटरी, पावर सप्लाय आणि चार्जिंग या गोष्टी आहेत. eKUV 100 ही कार फास्ट चार्जिंग होते. यामध्ये फक्त ५० मिनिटात कार ८० टक्के चार्ज होते. तसेच एकदा चार्जिंग झाल्यानंतर ही कार १४७ किलोमीटर लांब पर्यत धावू शकते.
कारमध्ये कंपनीने फुल टच स्क्रीन इंन्फोटेनमेंट सिस्टीम, कनेक्ट कार, ऑडिओ कंन्ट्रोल फीचर तसेच पेट्रोल-डिझेल एसयूव्हीतील सर्व फीचर दिले आहेत. महिंद्राची eKUV 100 ही कार इतर कंपन्यांच्या किमतीपेक्षा स्वस्त आहे. या कारमुळे अनेकांचे एक चांगली चारचाकी गाडी घेण्याचे स्वप्न पुर्ण होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ दुचाकीला आयुष्यभराची वॉरंटी, दहा रुपयात चालते शंभर किलोमीटर
मारुती सुझुकी लवकरच बाजारात आणणार नवीन इलेक्ट्रिक OMNI, किंमत असेल फक्त…
स्विफ्ट, डिझायर, वॅगनार मिळवा फक्त दोन लाखांत; मारूती सुझुकी कंपनीने दिला स्वस्त पर्याय