महिमा चौधरीने सांगितले खरे कारण; म्हणाली मी बॉलीवूड सोडले नाही सोडावे लागले

फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केल्यानंतर काही लोकांना लवकर यश मिळते. तर काही लोकांना अनेक वर्षे मेहनत केल्यानंतर देखील यश मिळत नाही. काही कलाकार तर असे आहेत. ज्यांचा पहिलाच चित्रपट सुपरहिट झाला होता. पहिल्याच चित्रपटापासून त्यांना यश मिळाले होते.

पण त्या कलाकारांना ते यश टिकवता आले नाही. काही वर्षांमध्येच ते कलाकार फिल्म इंडस्ट्रीमधून गायब झाले होते. अशीच एक अभिनेत्री म्हणजे महिमा चौधरी. महिमाला तिच्या पहिल्याच चित्रपटातून यश मिळाले होते. ती स्टार झाली होती.

जेवढ्या लवकर महिमाला यश मिळाले होते. तेवढ्यात लवकर ती फिल्म इंडस्ट्रीतून गायब देखील झाली होती. या मागे अनेक वेळा अनेकांना आपली मतं व्यक्त केली होती. पण त्यामागचे खरे कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

महिमाने स्वतः एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा केला. तिने सांगितले की, ती अचानक बॉलीवूडमधून गायब झाली नव्हती. तिने बॉलीवूड सोडले नव्हते. तिला बॉलीवूड सोडावे लागले होते. ज्यामागे खुप मोठे कारण आहे.

महिमा चौधरी म्हणाली की, ‘१९९७ मध्ये ‘परदेस’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. त्यानंतर मला खुप चांगले यश मिळाले होते. मला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. मी काही चित्रपट साइन केले होते. तर काही चित्रपटांच्या शुटिंग सुरू झाल्या होत्या’.

ती पुढे म्हणाली की, ‘१९९९ मध्ये अजय देवगन आणि काजोलसोबत बंगलरूमध्ये ‘दिल क्या करे’ चित्रपटाची शुटिंग करत होते. या चित्रपटाच्या शुटिंगसाठी मी हॉटेलवरून सेटवर जाते होते. त्यावेळी माझ्या गाडीला एका ट्रकने धडक दिली. त्या अपघातामध्ये मी खुप जखमी झाले होते.

त्यावेळी माझी मदत करण्यासाठी तिथे कोणीही उपलब्ध नव्हते. म्हणून मी घाबरले होते. मी जिवंत राहील की नाही? असा प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाला होता. अशा अवस्थेत मी बेशुद्ध झाले. त्यानंतर मला काही लोकांनी हॉस्पिटलमध्ये नेले आणि माझ्यावर उपचार सुरू करण्यात आले.

माझ्या चेहऱ्यावर एक ट्रिटमेंट करण्यात आली. माझ्या चेहऱ्यातून ६८ काचेचे तुकडे काढण्यात आले. माझा चेहरा पुर्णपणे खराब झाला होता. मी स्वतः ला आरश्यात पाहू शकत नव्हते. मी घाबरत होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर माझ्या चेहऱ्यावर दुखापत झाली होती.

म्हणून मला डॉक्टरांनी आराम करायला सांगितले होते. मी गोष्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणालाही सांगितली नव्हती. कारण मी ही गोष्ट सांगितली असती. तर माझ्या हातून अनेक चित्रपट गेले असते. माझा चेहरा खराब झाला आहे म्हणून मला कोणीही चित्रपटामध्ये घेतले नसते.

याच कारणामुळे मी थोडे दिवस फिल्म इंडस्ट्रीपासून लांब गेले होते. मी नवीन चित्रपट साइन केले नाहीत. जेवढे चित्रपट साइन केले होते. तेवढ्या चित्रपटांची शुटिंग पुर्ण केली आणि मी काही दिवस अभिनयातून ब्रेक घेतला. मी माझा चेहरा नीट करायला गेले होते. पण मी परत आल्यानंतर मला बॉलीवूडमध्ये काम मिळत नव्हते.

लोक महिमा चौधरीला विसरले होते. स्वतः ला वेळ देणे माझी चुक ठरली आणि माझे करिअर खराब झाले. पण मला आनंद आहे की, मी जेवढे चित्रपट केले. तेवढे चित्रपट लोकांना आवडले. आजही लोक ते चित्रपट पाहतात. माझी आठवण काढतात.मला चांगली संधी मिळाली तर मी नक्कीच कमबॅक करेल. असे तिने सांगितले.

महिमाने १९९७ मध्ये बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. त्यानंतर तिने धडकन, दिल है तुम्हारा, दाग यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण काही वर्षांनी ती बॉलीवूडमधून गायब झाली. २००५ मध्ये तिने लग्न केले. लग्न केल्यामुळे तिने चित्रपटांकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली आणि तिचे करिअर खराब झाले.

महत्त्वाच्या बातम्या –

‘तारक मेहता’मध्ये सोनूची भुमिका निभावणारी झील मेहता आज दिसते खुपच सुंदर; पहा फोटो

दिलीप कुमारच्या सांगण्यावरून गोविंदाने २५ चित्रपटांना दिला होता नकार

…म्हणून सलमान खानने आजपर्यंत कोणत्याही चित्रपटामध्ये किसिंग सीन दिला नाही

‘अजयचा मॅटर झालाय हा फोन येताच त्याचा बाप २०० फायटर पोरं घेऊन स्पाॅटवर पोहोचला’

साऊथच्या अभिनेत्रीच्या प्रेमात पागल झाले होते कपिल देव; केली होती लग्नाची तयारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.