महिमा चौधरीची मुलगी दिसते सेम तिच्यासारखी; पहा फोटो

‘परेसद’ गर्ल म्हणून फिल्म इंडस्ट्रीमध्ये ओळख असणारी महिमा चौधरी सध्या चित्रपटांपासून दुर राहत आहे. ९० च्या दशकात फिल्मी पद्यावर महिमाच्या सौंदर्याची जादू होती. महिमा बॉलीवूडच्या अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांना खुप कमी वेळात यश मिळाले होते.

गेल्या अनेक वर्षांपासून ती बॉलीवूडपासून दुर आहे. १९९७ मध्ये तिने दिग्दर्शक सुभाष घाईच्या परदेस चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. महिमाने १९९७ मध्ये बॉलीवूडमध्ये डेब्यु केल्यानंतर मागे वळून पाहिले नाही.

त्यानंतर तिने धडकन, दिल है तुम्हारा, दाग यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण काही वर्षांनी ती बॉलीवूडमधून गायब झाली. २००५ मध्ये तिने लग्न केले. लग्न केल्यामुळे तिने चित्रपटांकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली आणि तिचे करिअर खराब झाले.

लग्नानंतर काही दिवसातच महिमा आई झाली. तिने अरियाना नावाच्या मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर काही दिवसांनी महिमा पती बॉबी मुखर्जीपासून वेगळी झाली. नवऱ्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर महिमाने सिंगल मदर बनून तिच्या मुलीचा सांभाळ केला.

सिंगल मदर असली तरी तिने तिच्या मुलीसाठी कोणत्याही गोष्टीची कमी ठेवली नाही. तिची मुलगी आत्ता मोठी झाली आहे आणि तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अरियाना दिसायला महिमासारखीच आहे.

महिमाच्या मुलीच्या अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. तिला बघून प्रेक्षकांना महिमाची आठवण येते. सध्या चित्रपटांपासून दुर असली तरी महिमा तिच्या मुलीमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

महिमा सध्या आईची भुमिका एन्जॉय करत आहे. चित्रपटांसोबत ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामूळे देखील नेहमीच चर्चेत असायची. असे बोलले जाते की, महिमा लग्नापूर्वी गरोदर होती. म्हणून तिने घाईघाईत लग्न केले. पण हे लग्न जास्त काळ टिकले नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

सलमान खानसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम करणाऱ्या रिमी सेनने का सोडली फिल्म इंडस्ट्री?

‘द कपिल शर्मा शो’ मधील ‘हे’ दोन कलाकार लवकरचं अडकणार लग्नाच्या बेडीत

लग्नानंतर नवऱ्यासोबत मुंबईत आलिशान घरात राहते नेहा कक्कर; पहा घराचे फोटो

अभिनेते ज्युनियर मेहमूदने राजेश खन्नाबद्दल केले धक्कादायक खुलासे; म्हणाले ते तर…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.