दिलदार माही! १४५० किमी पायी चालत आलेल्या चाहत्याला फार्म हाऊसवर थांबवले आणि विमानाने घरी पाठवले

धोनीचे अनेक क्रेझी चाहते आहेत. काही दिवसांपासून धोनीचा १८ वर्षांचा सुपरफॅन ‘अजय गिल’ खूप चर्चेत आला आहे. अजय धोनीला भेटण्यासाठी १४३६ किलोमीटर चालत रांचीला पोहोचला आहे. पण, हा तरुण धोनीला भेटू शकला नाही कारण तोपर्यंत धोनी आयपीएल खेळण्यासाठी यूएईला रवाना झाला होता.

पण, आता धोनीच्या या चाहत्याची इच्छा पूर्ण झाली आहे. धोनीने आपल्या सुपरफॅनला मिठीच मारली नाही तर अजयला विमानाने हरियाणाला परत पाठवण्याचीही व्यवस्था केली. धोनी अजयला भेटला, त्याला त्याच्या फार्म हाऊसमध्ये बोलावले, मिठी मारली आणि त्याच्यासोबत फोटोही घेतला.

धोनीने त्याच्या सुपरफॅनची राहण्याची व्यवस्था त्याच्या फार्म हाऊसमध्येच केली होती. धोनीला भेटल्यानंतर अजय आपले अश्रू रोखू शकला नाही आणि म्हणाला – “माझे आयुष्य धन्य झाले.”

हा तरुण हरियाणातून पायी रांचीला पोहोचला होता. धोनीच्या निवृत्तीनंतर त्यानेही क्रिकेट सोडले होते. पण, आता धोनीच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा अजयने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करू शकेन असं म्हटलं आहे.

धोनीच्या या चाहत्याने सांगितले की, धोनी स्वत: त्याच्या स्वप्नात आला होता आणि त्याला पायी रांचीला येण्यास सांगितले होते. यानंतर धोनीची आज्ञा पाळणार आणि पायी रांची गाठणार असा निर्धार त्याने केला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.