साऊथ इंडस्ट्रीचा स्टार महेश बाबूच्या पहिल्याच सिनेमाची दमदार एन्ट्री झाली आहे. महेश बाबूच्या सिनेमाने ओपनिंग कलेक्शनमध्ये तब्बल ३६.०१ कोटी रुपयांची कमाई केली. बॉक्सऑफिसवर देखील या सिनेमाचा दबदबा पहायला मिळत आहे. सराकरू हा सिनेमा १२ मे रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे.
सिनेमाची ही कमाई फक्त आंध्रप्रदेश आणि तेलंगणा मधील आहे. सराकरू वारी पाटी या सिनेमाची उत्सुकता गेल्या अनेक दिवसांपासून सगळ्यांना लागली होती. महेश बाबूचा हा सिनेमा रिलिज झाला असून प्रेक्षकांनी सिनेमाला पहिल्याच दिवशी डोक्यावर घेतलं आहे. सराकरू या सिनेमाने पहिल्याचं दिवशी चांगली कमाई करून दाखवली आहे.
साऊथच्या सिनेमांना बॉक्सऑफिसवर चांगले दिवस देखील आल्याचे पहायला मिळत आहे. साऊथच्या सिनेमांनी नवनवीन विक्रम करणे सुरू ठेवलं आहे. सराकरू ह्या सिनेमाची कमाई कशी सुरू राहते, हे पहाणं देखील उत्सुकतेचे ठरणार आहे. सिनेमाचा देशभरातील आकडा ५० कोटी इतका झाला आहे.
महेशबाबू यांचा सिनेमा वर्षभरानंतर प्रेक्षकांच्याा भेटीला आला आहे. सिनेमाची जादू ही यूएसएमध्ये ही पहायला मिळत आहे. यूएसएमध्ये ११ मे रोजी महेश बाबूचा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. सराकरू या सिनेमाने बॉक्सऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे.
परदेशामध्येही महेश बाबूनं केलेला कमबॅक दमदार असल्याचं कमाईच्या आकड्यांमधून सिद्ध होत आहे. महेश बाबूचे फक्त साऊथमध्ये फॅन्स नव्हे तर यत्र, तंत्र सर्वत्र फॅन्स आहेत. महेश बाबूची उत्तर भारतात लोकप्रियता ही प्रचंड असल्याची बघायला मिळत आहे.
अनेकांना महेश बाबू यांना बॉलिवूडमध्ये काम करताना अनेकांना पाहण्याची इच्छा आहे. महेश बाबू यांनी अलीकडेच महेश बाबू यांनी बॉलिवूडमध्ये काम करण्याबाबत एक मोठं विधान केलं होतं. बॉलिवूडला मी परवडणार नाही, असं म्हणत महेश बाबूने हिंदी चित्रपट मधील सगळ्यांच निर्मात्यांच लक्ष वेधून घेतले आहे. परवडणार नसल्यामुळेच बॉलिवूडमध्ये काम करण्यात वेळ वाया नाही घालवायचा, असंही महेश बाबूने यांनी सांगितले आहे.
महत्वांच्या बातम्या:-
भडकाऊ भाषण देणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने झापले; असा आदेश काढला की कुणी हिंमतच करणार नाही
ज्ञानवापी मशिदीनंतर आता मथुरेतील ईदगाह मशिदीचीही होणार तपासणी? कोर्टाने दिला मोठा निर्णय
महेशबाबूचा धमाका! सराकरूने पहिल्याच दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई; आकडा वाचून चकीत व्हाल