Share

Mahesh Tilekar : शिवरायांच्या इतिहासातील खोट्या घटना दाखवून लोकांना लुटण्यापेक्षा…; मराठी दिग्दर्शकाने झाप झाप झापले

Akshay Kumar

Mahesh Tilekar : सध्या मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवनवीन ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. नुकताच “हर हर महादेव” हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर आता परत बुधवारी “वेडात मराठे वीर दौडले सात” या चित्रपटाची घोषणा झाली. २०२३ च्या दिवाळीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अशा ऐतिहासिक चित्रपटांवर प्रसिद्ध दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या चित्रपटांविषयी आपले मत व्यक्त केले आहे. मुलांना खऱ्या इतिहासाची ओळख व्हावी यासाठी त्यांना पुस्तकं वाचायला द्या असे त्यांनी म्हटले आहे.

महेश टिळेकर त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, खरा इतिहास वाचून समजून घ्यावा. दोनच दिवसांपूर्वी माझ्या एका हितचिंतक मित्राने मला सुचवले की मी गाव तसं चांगलं, वन रूम किचन, हवाहवाई सारखे कौटुंबिक, विनोदी सिनेमे केले. आता पुढचा सिनेमा ऐतिहासिक करावा आणि तो छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर असावा.

यावर मी त्याला माझं स्पष्ट मत सांगितलं. ऐतिहासिक सिनेमा तोही महाराजांच्यावर करायचा तर ते शिवधनुष्य पेलण्याची कुवत माझ्यात नाही आणि बॉलीवूडमध्ये जसं हिरोची एन्ट्री हवेतून उडी मारत गुंडांना मारहाण करत होते. तशी ऐतिहासिक पात्रे दात, ओठ खात बेंबीच्या देठापासून किंचाळत सिनेमात दाखवणं मनाला पटत नाही, असे ते म्हणाले.

तसेच लोकांना आकर्षित करण्यासाठी गल्ला भरण्यासाठी ऐतिहासिक सिनेमात मसाला भरून पुढच्या पिढीला सिनेमातून चुकीचा इतिहास दाखवण्याचं पाप करण्यापेक्षा खरा इतिहास पुस्तकातून वाचून समजावा म्हणून मी इतरांना पुस्तके भेट देईन, असेही ते म्हणाले.

पुढे त्यांनी लिहिले की, माझं सगळं ऐकून घेऊन मित्राने पुन्हा सल्ला दिला की मला जर चांगला फायनान्स मिळाला तर काय हरकत आहे असे सिनेमे करायला. फायनान्स मिळतोय म्हणून स्वतःच्या सोयीप्रमाणे इतिहास बदलून केवळ पैसे मिळवण्यासाठी धंदाच करण्याच्या हेतूने ऐतिहासिक सिनेमा केला तर लोकांच्या शिव्या मिळतीलच. पण जेव्हा जेव्हा कुठेही महाराजांची प्रतिमा दिसेल, त्यांचे चित्र समोर येईल तेव्हा ज्यांच्यामुळे आज आपण आहोत त्या माझ्या छ्त्रपती शिवाजी महाराजांशी, त्यांचा पराक्रम, इतिहासाशी मी प्रतारणा केल्याचं शल्य मला कायम बोचत राहणार, ती जखम अश्वत्थामाच्या जखमेसारखी मरेपर्यंत न भरून येणारी असेल.

सिनेमॅटीक लिबर्टी घेत धंदेवाईक सिनेमा करून पैसा कमवणे एकवेळ मला मान्य आहे पण खोटा इतिहास, खोट्या घटना दाखवून सिनेमा करून आपला मोठेपणा मिरवत लोकांचे पैसे लुटून त्यांच्या नजरेत दरोडेखोर म्हणून आपली ओळख आपणच का निर्माण करून द्यावी? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

महेश टिळेकर यांनी पुढे लिहिले की, महाराज आज असते तर आपल्याला दरोडेखोर म्हणून तोफेच्या तोंडी दिलं असतं की कडेलोट केला असता याची क्षणभर कल्पना करून पहा. माझ्या मित्राला माझे हे म्हणणे पटले आणि त्याच्या मुलांना खऱ्या इतिहासाची ओळख व्हावी म्हणून तो त्यांना पुस्तकं वाचायला देणार आहे. मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीला वाचन करण्याचीही सवय यानिमित्तानं आपण सर्वांनी करून द्यायला काय हरकत आहे.

महत्वाच्या बातम्या
narendra modi : ब्रेकींग! महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न कायमचा सुटणार; थेट मोदींची मध्यस्थी, कोल्हापूरात मोठ्या घडामोडी 
sharad koli : शिवसेनेचा गनिमी कावा; अटकेसाठी आलेल्या पोलिसांना चकवा देत शिवसेना नेता फरार
shivsena : जळगावात तुफान राडा! बड्या नेत्याला अटक करायला आलेल्या पोलिसांना भिडले शिवसैनिक
sanjay shirsat : शिंदेगटातील मेन मास्टरमाईंट पुन्हा शिवसेनेत येणार; बड्या नेत्याच्या दाव्याने राज्यात भूकंप

 

 

 

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now