‘बेसूर गाणं गाणाऱ्या गायिकेचे कौतूक न केल्यामुळे भक्तांनी बोंबलायला सुरवात केलीय’

मुंबई | दिग्दर्शक, निर्माता महेश टिळेकर यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. अमृता फडणवीस यांचे एक गाणे रसिकांच्या भेटीस आले आहे. भाऊबीजेच्या निमित्ताने त्यांनी हे गाणं गायले.

या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आता यावरून राजकारण देखील तापायला सुरुवात झाली आहे. काही भाजप समर्थकांनी अमृता फडणवीस यांची पाठराखण करत टिळेकरांचा संबंध थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंशी जोडला आहे.

याचाच धागा पकडत टिळेकरांनी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबतचे फोटो शेअर करत ट्रोर्लसना सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. याबाबत फेसबुक पोस्ट करत टिळेकर म्हणतात, ‘बेसूर गाणं गाणाऱ्या गायिकेच मी कौतुक न केल्यामुळ माझ्या पोस्टमुळे  अनेकांचे कान ठणकू लागले आहेत आणि त्यांना पोट दुखी पण सुरू झाली आणि त्यांचे पित्त उसळले आहे’.

तसेच पुढे पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘मला येणाऱ्या कमेंट्स मधून समजलं.शरद पवार साहेब आणि सुप्रिया ताई यांच्या बरोबरचे माझे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून त्या गायिकेच्या चाहत्यांनी ,भक्तांनी बोंबलायला सुरुवात केली,’ असे महेश टिळेकर यांनी म्हंटले आहे.

अमृता फडणवीसांच्या गाण्यावरून दोन स्टार आमनेसामने…
गायी म्हशीच्या हंबरण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण हा आवाज सहन होत नाहीत,’ महेश टिळेकर यांच्या या टीकेला अभिनेता आरोह वेलणकर याने उत्तर दिले आहे. “स्त्री शक्ती, सन्मानाच्या गोष्टी करता आणि ही कसली भाषा? तुमची टीका वाचून लाज वाटली. तसंच तुमच्या मराठी तारका या कार्यक्रमात कोण काम करतंय बघू,” असं आरोह वेलणकरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले.

आरोहने केलेल्या टीकेवर महेश टिळेकर यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. “जिच्यावर मी पोस्ट लिहिल्यामुळे तुझा थयथयाट होऊन तू मला धमकी वजा संदेश देतोय, तुझ्या बापाची मालकी आहे की राज्य आहे इथ, कोण माझ्याकडे कार्यक्रम करणार म्हणून तू धमकी देऊन,” असे महेश टिळेकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
विराटला त्याच्या पदावर राहू द्या, आपल्या संस्कृतीत दोन कर्णधार होऊ शकत नाही; कपिलने सुनावले
भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील ‘ही’ अभिनेत्री दिसते अतिशय हॉट आणि ग्लॅमर्स
जॅकी श्रॉफच्या फार्म हाऊसमध्ये बंगला, जिम, स्विमिंग पुलसोबतच ‘या’ सुविधा आहेत उपलब्ध

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.