हरिद्वार: एखाद्या व्यक्तीला अचानक लॉटरी जिंकली तर त्याचे पाय जमिनीवर राहत नाहीत. काही लोक ते सांभाळतात, तर काही त्यांचा संयम गमावतात. असेच एक प्रकरण उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये समोर आले आहे.
येथे एका व्यक्तीने ड्रीम इलेव्हनमध्ये कथितरित्या 1 कोटी 35 लाख रुपये जिंकले. यानंतर त्याच्या आनंदाला थारा नव्हता. या आनंदात त्याने भरपूर मद्यपान केले आणि नशेत आल्यावर त्याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
गोंधळाची माहिती मिळताच पोलीस आले असता त्यांच्याशीही त्यांने गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी हे माझे भाऊ आहे म्हणत पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची धमकी देऊ लागला. यानंतर पोलिसांनी शांतता भंग केल्याप्रकरणी त्या आरोपीला ताब्यात घेतले.
जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
मिळालेल्या माहितीनुसार, सिडकुल परिसरात राहणाऱ्या महेश सिंह धामी नावाच्या व्यक्तीने ड्रीम इलेव्हनवर 1 कोटी 35 लाख रुपये जिंकले. कर कपातीनंतर त्यांच्या खात्यात ९६ लाख रुपये आले. हा आनंद साजरा करण्यासाठी, त्याने भरपूर मद्यपान केले आणि राडा सुरू केला.
तक्रारीवरून पोलिस पोहोचल्यावर त्याने स्वतःला मुख्यमंत्री धामी यांचा भाऊ असल्याचे सांगून पोलिसांशीही गैरवर्तन करण्यास सुरुवात केली आणि तुमची वर्दी उतरवेल अशी धमकी दिली.
यानंतर पोलिसांनी महेश सिंह धामी यांना पोलिस ठाण्यात आणले. या काळातही त्याचा राडा सुरूच होता. कोतवाल रमेश सिंह तंवर यांनी सांगितले की, त्रास देणाऱ्या व्यक्तीला शांतता भंगाच्या कलमाखाली दंड करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
भाजपने उमेदवारी न दिल्याने मुक्ता टिळकांचे पती नाराज; अश्रू पुसत म्हणाले, पक्षाने अन्याय केला, आता….
कलाटेंना उमेदवारी देताच राष्ट्रवादीत उभी फूट; स्थानिक नेत्यांनी अजितदादांविरोधात थोपटले दंड, म्हणाले आता आम्ही…
शरद पवारांमुळेच मुख्यमंत्रीपद हातातून गेले; अजित पवार स्पष्टच बोलले, थेट काकांची चूकच दाखवली