महेश कोठारेंनी मागितली जाहीर माफी, गौतम बुद्धाच्या फोटोवरून झाला होता वाद…

मुंबई । मराठी चित्रपट आणि मालिकेतील निर्माते एक मोठे नाव म्हणजे महेश कोठारे. मात्र ते आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने मोठी लोकप्रियता मिळवली आहे. मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाने ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरवली आहे.

या मालिकेचा टीआरपी देखील वाढला होता. यामुळे मालिका एकदम टॉपला होती. मात्र या मालिकेबाबत अनेकांनी आक्षेप घेतला आहे. यामुळे महेश कोठारे यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी अनेकांनी केली होती. यामुळे आता या मालिकेचे निर्माते महेश कोठारे यांनी सोशल मीडियावरून नुकतीच जाहीरपणे माफी मागितली आहे.

याचे कारण आता पुढे आले आहे, मालिकेचा १४ सप्टेंबरचा भाग आक्षेपार्ह असल्याचे म्हटले गेले होते. त्यामध्ये सँडी विश्वास हे पात्र वंदणीय गौतम बुद्धाचा फोटो असलेला ब्लाउज घातला होता. या फोटोमुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे मत प्रेक्षकांनी व्यक्त केले होते.

अशा पद्धतीने विटंबना होते असा आक्षेप व्यक्त झाला होता. या भावना दुखावल्या गेल्या असल्याने त्याची दखल महेश कोठारे यांनी घेतली आणि माफी मागितली. यापुढे आमच्याकडून अशी कुठलीही चूक होणार नाही असे मी तुम्हाला आश्वस्त करतो असे महेश कोठारे यांनी म्हटले आहे.

जाणूनबुजून आम्ही कोणीही ही चूक केलेली नाही. तुम्हा सर्वांची मी मनापासून माफी मागतो आणि तुम्ही सुद्धा मला माफ कराल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. महेश कोठारे यांच्या माफीनाम्यानंतर चाहत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या जाहीरनाम्यात त्यांनी म्हटले आहे की, वंदनीय गौतम बुद्ध हे आम्हाला कायमच आदरणीय आहेत. त्यांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचा आमचा मुळीच हेतू नव्हता. तुम्हा सर्वांची मी मनापासून माफी मागतो. तुम्ही सुद्धा मला माफ कराल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.