स्वत:वरील ‘त्या’ गंभीर आरोपांवर महेश भट यांनी सोडले मौन; म्हणाले..

नेहमीच चर्चेत असणाऱ्या महेश भट यांच्याविरोधात काही दिवसांपुर्वी त्यांच्या सुनेने एक व्हिडिओ जारी केला होता. भट यांचे पुतणे सुमित सबरवाल यांची पत्नी लव्हिना लोध यांनी भट कुटुंबावर गंभीर आरोप करीत एक व्हिडिओ जारी केला होता. आता त्या व्हिडिओला निर्माते महेश भट यांनी प्रतिउत्तर देत आरोप फेटाळून लावले आहेत.

अभिनेत्री लवेना लोध यांनी केलेले सर्व आरोप चुकीचे व निराधार असल्याचे चित्रपट निर्माते बंधू महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांनी शुक्रवारी सांगितले. तसेच लवकरच सत्य बाहेर येईल असेही ते म्हणाले. तसेच महेश भट्ट यांच्या वकिलांनी निवेदन जारी करून सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. लविना लोधने केलेले सर्व आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत, असे महेश भट्ट यांच्या वकिलांनी म्हटले आहे.

तसेच शुक्रवारी भट बंधूंनी एक निवेदन केले की, ते एक सुप्रसिद्ध व्यक्ती असल्याने त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात येत आहेत. त्यानंतर महेश भट्ट यांनी लविना लोधच्या विरोधात मुंबई हायकोर्टात मानहानीचा दावा दाखल केला आहे.

काही दिवसांपुर्वी एका व्हिडिओमध्ये लव्हिनाने महेश भट्टवर अत्याचार आणि तिला धमकावल्याचा आरोप केला होता. महेश भट्ट यांचा पुतण्या आणि तिचा नवरा सुमित साबरवाल चित्रपटाच्या कलाकारांना ड्रग्ज आणि मुलींची पुरवठा करतात, असे ती म्हणाली. तसेच महेश भट्ट हे चित्रपट उद्योगातील सर्वात मोठे डॉन असून त्यांनी अनेकांचे करियर पडद्याच्यामागे राहून बरबाद केले आहे.

तारक मेहता मधील छोट्या गोगीला जीवे मारण्याची धमकी कुणी दिली? गोगी काय म्हणतोय पहा..

ऋतुराज गायकवाडने केला खास विक्रम; जो विक्रम धोनी आणि सुरेश रैनाही करू शकले नाही

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.