बाॅलीवूडचा सर्वात यशस्वी खलनायक महेश आनंदचा मृतदेह दोन दिवस सडत पडला होता..

आज आपण ज्या व्यक्तिबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांनी ८० आणि ९० च्या दशकामध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती. हे दिसायला कोणत्याही हिरोपेक्षा कमी नव्हते. पण काम मात्र करायचे खलनायकाचे.

त्यांनी वीस वर्ष फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केले. पण त्यानंतर पंधरा वर्ष त्यांना इंडस्ट्रीमध्ये कोणतेही काम मिळाले नाही. एवढेच काय यांच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी लोकांना समजले की यांचा मृत्यू झाला आहे. हे अभिनेते आहेत महेश आनंद.

महेश आनंद लहान असतानाच त्यांच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ते बहिणीसोबत वाढले. त्यांना लहानपणापासूनच बॉडी बिल्डींगची खुप आवड होती. त्यामूळे ते नेहमी व्यायाम करायचे.

बॉलीवूडमध्ये एन्ट्री –
मोठे झाल्यानंतर त्यांनी मॉडेलिंग करायला सुरुवात केली. मॉडेलिंगसोबतच त्यांना डान्स करायला खुप आवडायचे. मॉडेलिंगनंतर त्यांना चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या.

त्यांनी ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी अभिनेता बनण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर त्यांना ‘सस्ती दुल्हन मेंहगी दुल्हन’ चित्रपटाची ऑफर आली. त्यांनी या चित्रपटाला होकार दिला. या चित्रपटात ते मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटामध्ये खलनायकाची भुमिका केली.

गुमराह चित्रपटातील प्रसिद्ध किस्सा –
‘गुमराह’ चित्रपटामध्ये महेश आणि संजय दत्त या दोघांचा एक फाईट सीन होता. हा सीन बॉडी डबलला करायचा होता. पण त्यादिवशी बॉडी डबल शुटींगसाठी आलाच नाही.

त्यानंतर महेश भट्टने महेश आनंदलाच हा सीन करायला सांगितला. त्यांनी हा सीन केला आणि त्यांनतर या सीनसाठी त्यांचे खुप कौतुक झाले. या चित्रपटाच्या शुटींगवेळी महेश आनंद आणि संजय दत्तची खुप चांगली मैत्री झाली होती. महेश आनंदला बॉलीवूडमध्ये त्यांच्या बॉडीमुळे खुप काम मिळत होते आणि ते यशस्वी होत होते.

वैयक्तिक आयुष्य –
फिल्म इंडस्ट्रीमध्ये ते हिट झाले होते. पण त्यांचे आयुष्यात मात्र आनंद नव्हता. कारण त्यांनी एक दोन नाही तर पाच लग्न केले. पण तरीही ते शेवटी एकटे होते.

त्यांनी पहीले लग्न बरखा रॉयसोबत केले. ज्या रिना रॉयच्या बहीण आहेत. पण हे लग्न जास्त काळ टिकले नाही. त्यानंतर त्यांनी एरिका डिसूझासोबत केले. त्या दोघांना त्रिशूल हा मुलगा झाला. पण त्यानंतर ते दोघे वेगळे झाले.

१९९३ त्यांनी तिसरे लग्न मधू मल्होत्रासोबत केले. पण हे लग्न देखील जास्त काळ टिकले नाही. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री उषासोबत चौथे लग्न केले. त्यांचे एकही लग्न टिकले नाही.

८० ते ९० च्या दशकातील खलनायक –
८० आणि ९० च्या दशकात महेश आनंदने अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाचे काम केले. त्यांनी खुप पैसा देखील कमावला होता. पण ९० च्या दशकाच्या शेवटी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अक्षय कुमार, सुनिल शेट्टी यांसारखे अभिनेते आले होते.

त्यामुळे महेश आनंदला काम मिळणे कमी झाले. त्यानंतर त्यांच्यासोबत एक अशी घटना झाली. ज्यामुळे ते फिल्म इंडस्ट्रीपासून दुर गेले.

महेश आनंद २००० मध्ये एका चित्रपटाची शुटींग करत होते. ही शुटींग करताना महेश जखमी झाले. त्यांची ही जखम खुपच मोठी होती. एवढी मोठी की त्यांना सहा महिने हॉस्पिटलमध्ये राहावे लागले. अनेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते.

उपचारानंतर ते परत आले. पण त्यांना इंडस्ट्रीमध्ये काम मिळाले नाही. कारण तोपर्यंत इंडस्ट्रीमध्ये अनेक नवीन चेहरे आले होते. त्यामूळे परत एकदा इंडस्ट्रीपासून खुप लांब जाऊ लागले.

या सर्व गोष्टीमुळे ते डिप्रेशनमध्ये गेले. दारु पिऊ लागले. २०१३ त्यांनी चित्रपटांमध्ये कमबॅक करण्याचा निर्णय घेतला. त्यांना या वेळेस ती संधी मिळाली.

त्यांनी ‘रंगीला राजा’ चित्रपटातून कमबॅक केले. या चित्रपटामध्ये त्यांनी फक्त सहा मिनीटांची भुमिका केली होती. पण ते खुश होते. कारण १८ वर्षांनंतर त्यांनी चित्रपटामध्ये काम केले होते.

महेश आनंद अनेक आर्थिक अडचणींचा सामना करत होते. त्यांनी जेव्हा चित्रपटांमध्ये कमबॅक केला. तेव्हा ते खुपच आनंदी होते. पण हा चित्रपट रिलीज होण्याअगोदरच महेश आनंदचा मृत्यू झाला होता.

त्यांचा मृत्यू खुप रहस्यमयी होता. कारण त्यांच्या मृत्यूच्या दोन दिवसानंतर लोकांना समजले की, त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर फिल्म इंडस्ट्रीतील कोणताही कलाकार त्यांच्या अत्यंसंस्काराला आला नाही. ही सर्वात वाईट गोष्ट होती.

महत्वाच्या बातम्या..
म्हणून त्या दिवशी करिष्माने शाहीद कपूरला सेटवरून हाकलून दिले होते; जाणून घ्या कारण..

सावधान! रात्री झोपताना उशाखाली मोबाईल ठेवल्यावे आरोग्यावर होतील गंभीर परीणाम
सचिनची मुलगी सारा तेंडूलकर शुभमन गिलची पत्नी? पहा कसं काय घडलं हे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.