महेंद्रसिंग धोनी आता झाला पुणेकर, पुण्यात घेतले घर, पाहा फोटो

पुणे । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनी वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतो. त्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. तसेच त्याच्या हेलिकॉप्टर शॉर्टमुळे जगभर त्याचे लाखो चाहते आहेत.

आता त्याच्या बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. महेंद्रसिंग धोनी आता पुणेकर झाला असून त्याने पुण्यामध्ये स्वतःचे घर घेतले आहे. पुण्यामध्ये गहुंजे येथील क्रिकेटच्या स्टेडियममध्ये अनेक सामने खेळले जातात. तसेच इतर कामासाठी त्याचे पुण्यात येणे-जाणे असते. यामुळे त्याने पिंपरी चिंचवड भागामध्ये घर घेतले आहे.

यामुळे पुण्यातील चाहत्यांसाठी एक आनंदाची बाब ठरली आहे. आयपीएल स्थगित झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनी सध्या रांची येथील त्याच्या फार्म हाऊसवर आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. रांची येथील त्याच्या फार्म हाऊसमध्ये तो शेतीदेखील करतो.

अनेक प्रकारच्या भाज्या तसेच तो दुग्ध व्यवसाय देखील करतो. शेतामध्ये त्याने लावलेली स्ट्रॉबेरी परदेशात देखील विक्रीसाठी गेली आहे. क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर आता तो शेतीकडे वळाला आहे. आणि यामध्ये यशस्वी देखील ठरला आहे.

पुण्यात घर घेतल्यानंतर काहीवेळा मॉर्निंग वॉकसाठी तो बाहेर पडताना अनेकांनी त्याला बघितले आहे. यामुळे आता महेंद्रसिंग धोनी पुण्यातच स्थायिक होणार का अशी चर्चा देखील सुरू आहे. यामुळे त्याचे पुण्यातील चाहते खुश आहेत.

धोनीचे अनेक चाहते त्याचा एक फोटो मिळवण्यासाठी दिवसभर वाट बघत असतात. त्याच्या शांत संयमी खेळीने त्याने अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. आयपीएलमध्ये तो पुण्याकडून देखील खेळला आहे.

ताज्या बातम्या

‘बाहुबली’तलं माहिष्मती साम्राज्य काल्पनिक नाही, याठिकाणी आहे खऱ्या अस्तित्वाची नोंद

होय हे खरं आहे! ‘बाहुबली’तील माहिष्मती काल्पनिक नाहीच, वाचा कुठे आहे हे अनोख राज्य

जिल्हाबंदी १० जूननंतर उठणार, तर १ जूनपासून ५० टक्के कार्यालये सुरू होण्याची शक्यता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.