काही दिवसांपूर्वी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. यानंतर भाजपकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. आता भाजपने राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत मोर्चा काढला आहे.(mahavikas aghdi take action on bjp)
आज सकाळी मुंबईतील आझाद मैदानावर भाजपने नवाब मलिक यांच्या विरोधात निदेर्शने केली. आझाद मैदानापासून भाजपचा मोर्चा निघाला होता. मेट्रो सिनेमाजवळ मुंबई पोलिसांनी हा मोर्चा अडवला. तसेच या मोर्चामधील भाजपच्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे.
भाजप नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेते राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आझाद मैदानावर निदर्शने करत होते. त्यामुळे त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर मेट्रो जंक्शनवरून बॅरिकेड्स हटवून मार्ग खुला करण्यात आला आहे.
आझाद मैदानावरील सभेत भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा संघर्ष देशद्रोहींच्या विरोधात आहे. पाकिस्तानी लोकांसोबत मिळून काम करणाऱ्या लोंकांविरोधात हा संघर्ष आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मालिकांनी बॉम्बस्फोटाच्या आरोपींकडून जमीन विकत घेतली आहे. पण महाविकास सरकारने अजून त्यांचा राजीनामा घेतला नाही.
ही घटना राज्यासाठी लाजिरवाणी आहे. सरदार शहावली खान याने याकूब मेननसोबत बॉम्बस्फोटाचे प्रशिक्षण घेतले. त्याने बॉम्बस्फोट घडवून आणला. तो आज देखील तुरुंगात आहे. बॉम्बस्फोटातील आरोपींकडून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मालिकांनी कवडीमोल भावात जमीन विकत घेतली. तरी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेतला नाही”, असा आरोप भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभेत केला.
मुंबई अंडरवर्ल्ड, फरारी गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीनंतर ईडीने नवाब मलिक यांना अटक केली होती. नवाब मलिक यांची जमीन व्यवहाराबाबत चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने अल्पसंख्यांक मंत्री नवाब मालिक यांना ८ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती.
महत्वाच्या बातम्या:-
राज्यपालांनी लोकशाहीचा गळा घोटला; आघाडी विरोधात कोर्टात जाणाऱ्या भाजपलाच कोर्टाने झापले
माझ्यासोबत चुकीचं वागणाऱ्यांना मी सोडणार नाही; तेजश्री प्रधानची जाहीर धमकी कुणाला?
VIDEO: खेसारीलालचं ‘छू के छोड देला’ गाणं रिलीज, बेडरूममध्ये रोमांस करताना दिसले खेसारी-रक्षा