राज्यातील राजकीय घडामोडींना वेग; आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात होणार मोठे फेरबदल

मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकार वेगवेगळ्या प्रकरणांमुळे सतत अडचणीत येत आहे. यामुळे ते विरोधकांच्या टीकेचे धनी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अशात आता मंत्रिमंडळात फेररचना संदर्भात मोठ्या हालचालींना वेग आला आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन तशी मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसमधील काही अंतर्गत बदलाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच यापुर्वी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या नेत्यांमधील भेटीगाठींमध्ये महाविकास आघाडी मंत्रिमंडळातील फेररचनेसंदर्भात महत्वाची चर्चा झाली आहे.

याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, मंत्रीमंडळ फेररचना संदर्भात आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते सोनिया गांधी, शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. हा निर्णय लवकरच तुम्हाला कळेल.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील गृहमंत्री पदावर नवीन चेहऱ्याची नियुक्ती केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शरद पवारांचे विश्वासू सहकारी असलेले अनिल देशमुख यांच्या कामगिरीवर अंतर्गत नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

तसेच संजय राठोड यांचा वनमंत्रीपदाचा राजीनामा मंजुर करण्यात आला आहे. त्यामुळे त्या खात्याची जाबाबदारी नव्या व्यक्तीवर सोपवण्याची तयारी सुरू आहेत. याशिवाय काँग्रेसमध्येही काही फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-
ठाकरे मंत्रीमंडळात मोठ्या प्रमाणात फेरबदल होण्याची शक्यता; पहा कुणा कुणाचे मंत्रीपद धोक्यात
‘आताची शिवसेना ही नक्कीच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असूच शकत नाही’
भाजपला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी कोणासोबतही युती करण्याची तयारी- इम्तियाज जलील

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.