महाराष्ट्र राज्यात होतोय कोरोना कमी; घ्या आजची स्थिती जाणून

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आणि रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे मृत्युदर पण वाढत होता. पण आता एक सकारात्मक बातमी पुढे येत आहे.

राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा काही अंशी कमी होत असल्याचे दिसून आले आहे. राज्यात २९ हजार १७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर नव्या २६ हजार ६७२ रुग्णांचं निदान झालं आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांचा मृत्युदर पण कमी होताना दिसून येत आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर १.५९ टक्के एवढा असून सोमवार दिनांक २४ मेला ५९४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण ५१ लाख ४० हजार २७२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. महाराष्ट्र राज्यात बरे होण्याचे प्रमाण पण वाढले आहे. बरे होण्याचे रुग्णांचे प्रमाण ९२. १२ पर्यंत गेले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,३०,१३,५१६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५५,७९,८९७ (१६.९टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात काही व्यक्ती घरगुती विलगीकरणात असून काही जण संस्थात्मक विलगीकरणात असल्याचे समजते आहे.

कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या आधी सावधगिरी म्हणून उद्धव ठाकरे यांनी बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स तयार केली आहे. कोरोनाचा धोका अजून तरी पूर्णपणे टळलेला नसल्याचे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या
टीव्ही क्षेत्रात एक अशी प्रसिद्ध मुस्लिम अभिनेत्री; जिने कधीच बिकिनी किंवा तोकडे कपडे घालून अभिनय केला नाही

तमिळनाडूच्या या पठ्ठ्याने लग्नासाठी विमानचं केलं बुक, अन् हवेतच बांधली लग्नगाठ; पाहा व्हिडिओ

…म्हणून मीनाषी शेषाद्रीने ‘दामिनी’ चित्रपटानंतर एकही चित्रपट साईन केला नाही

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.