महाराष्ट्र केसरीचे स्वप्न भंगले; पैलवानाचा विजेच्या धक्क्याने दुःखद मृत्यू

सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध पैलवानाचा विजेच्या धक्याने दुःखद मृत्यू झाला आहे. वाटेगाव तालुका वाळवा येथील प्रसिद्ध युवा पैलवान पै. सुकुमार संजीव जाधव यांचा खांबावरील विजेच्या धक्याने मृत्यू झाला आहे. गुरुवार दिनांक २० मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली.

पैलवानाला विजेचा धक्का बसल्यानंतर कराडला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण पैलवानाचा रस्त्यातच मृत्यू झाला होता. नवीनच मल्लाचे निधन झाल्यामुळे गावावर दुःखाचे सावट पसरले आहे.

या घटनेने वाटेगाव गाव परिसर सुन्न झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुकुमार हा मित्राच्या येथे पोल्ट्रीच्या कामानिमित्त गेला होता. यावेळी अँगल उभा करण्याच्या कामात पैलवान जाधव व्यस्त होता.

त्याचा धक्का अँगल उभा करत असताना शेजारून जाणाऱ्या तीव्र प्रवाहाच्या विजेच्या तारेला पैलवान जाधव याचा धक्का बसला. यावेळी सुकुमारला जोराचा झटका बसल्याने तो खाली पडला.

मित्रांनी ताबोडतोब त्याला कराडला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले पण त्याचा रस्त्यातच दुःखद अंत झाला. पैलवानचे स्वप्न महाराष्ट्र केसरी होण्याचे होते, पण आता त्याच्या मृत्यूने सगळेच धुळीला मिळाले आहे.

पैलवान कै. हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचा तो शिष्य होता. न्यू मोतीबाग तालीम कोल्हापूर येथे त्याने १४ वर्ष कुस्तीचे धडे घेतले होते. अजिंक्य पैलवान म्हणून पंचक्रोशीत त्याची ओळख होती. त्याला पैलवान बनविण्यासाठी आजोबांनी अनेक खस्ता खाल्या.

ताज्या बातम्या
माहीच्या पहिल्या गर्लफ्रेंडचे फोटो पाहिलेत का.? अपघातात झाला होता मृत्यू

“यालाच म्हणतात लिपस्टिक दौरा, कोकण सब हिसाब करेगा.. याद रखना शिवसेना”- नितेश राणे

केंद्र सरकारकडून तब्बल १ लाख LPG डिलिव्हरी सेंटर सुरू, सेंटर मिळवण्यासाठी असा करा अर्ज

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.