महाराष्ट्राची अप्सरा मालदीवमध्ये! समुद्रकिनारी सोनाली कुलकर्णीचा बिकिनीतील हॉट लूक; फोटो व्हायरल

मुंबई। मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लग्नबंधनात अडकल्यापासून कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत आहे. कधी ती नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो पोस्ट करते तर कधी नवऱ्यासोबत व्यायाम करतानाचे व्हिडिओ शेअर करत असते .

सोनाली सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. अशातच सोनाली सध्या आपल्या नवऱ्यासोबत म्हणजेच कुणाल बेनोडेकर याच्यासोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मालदीवला गेली आहे. चाहत्यांसाठी सोनालीने मालदिव ट्रिपचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

व या फोटोंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सोनालीच्या बिकिनी लूकमधील फोटोने नेटकऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. मालदीवच्या समुद्रकिनारी कुणालच्या हातात हात देऊन सोनाली हा रोमँटिक फोटो काढला आहे.

सोनालीने शेअर केलेला हा बिकीनी लूक सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोमध्ये सोनाली प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. सोनालीचा हा हॉट लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनी तिच्या या फोटोवर कमेंट केल्या आहेत.

नेटकऱ्यांसोबतच सुबोध भावे, अमेय वाघ, प्रार्थना बेहेरे, पूजा सावंत, गौहर खान, हेमंत ढोमे, पर्ण पेठे या सेलिब्रिटींनीही सोनालीच्या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत.

कोरोनाची परिस्थिती पाहता सोनाली आणि कुणालने ७ मे ला लग्नात फारसा खर्च न लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती आपल्या पतीसोबत दुबईत राहत होती. व त्यानंतर ती कायम आपल्या पतीसोबतचे रोमँटिक फोटोज व व्हिडीओज शेअर करत असते.
महत्वाच्या बातम्या
आता वर्क फ्रॉम होम करून महिला कमावू शकतात बक्कळ पैसा; या कंपन्या देतायत ७० टक्के वेतन
नवरा वाढदिवस विसरला म्हणून बायकोने नवऱ्याला दिली ‘ही’ भयंकर शिक्षा, वाचून धक्का बसेल
…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली सेवानिवृत्त झालेल्या जवानाची मिरवणूक, पाहा व्हिडिओ
सियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी निघताना घात झाला, महाराष्ट्राच्या सुपुत्राचा दुर्दैवी मृत्यू

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.