अप्रतिम! या पठ्याने महाराष्ट्रात पहिल्यांदाच केली खजूर शेती, आता कमावतोय बक्कळ पैसा

कोरोनामुळे पुर्ण देश लॉकडाऊन होता पण फक्त एकच माणूस या लॉकडाऊनमध्येही राबत होता तो म्हणजे आपला बळीराजा. त्यामुळे लॉकडाऊनमुळे घरात अडकलेल्या लोकांना अन्नाची कमतरता पडत नव्हती.

त्यांना भाज्या, दुध सहज मिळत होते. अशाच एका फळउत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याची आज आम्ही तुम्हाला यशोगाथा सांगणार आहोत. त्या शेतकऱ्याचे नाव आहे सेवी थंगवेल. निराशेच्या वातावरणात त्यांनी खजूराची शेती करून आपल्या जीवनाची नवीन सुरूवात केली होती आणि आज ते लाखो रूपये कमवत आहेत.

कोरोनाच्या काळात लाखो शेतकऱ्यांप्रमाणे त्यांनीही शेतात खुप कष्ट केले. आता त्यांच्या खजुराच्या पिकाला मोठा भाव मिळण्याची शक्यता आहे. दोन एकरात ८ लाख रूपयांचे उत्पन्न मिळण्याची त्यांना आशा आहे.

महाराष्ट्रातील ही पहिलीच खजूराची शेती आहे. सेवी थंगवेल यांनी २००९ मध्ये दीड एकरात खजूरांच्या १३० झाडांची लागवड केली होती. त्यांना चार वर्षांनंतर खजूराचे उत्पादन मिळू लागले. दरवर्षी ८ ते १० लाखांचे उत्पन्न मिळवून देणारे हे पिक असून हे पिक ७० वर्षे शेतकऱ्याला नफा देणारे आहे.

हवामानातला बदल, कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ अशा बिकट परिस्थितीतही त्यांनी शेतीचे योग्य नियोजन केले होते. त्यांनी नागपूरात अशक्य होणारी गोष्ट करून दाखवली. गेल्या वर्षापासून त्यांनी या शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळवले आहे.

त्यांनी नागपूरपासून १५ किलोमीटर असलेल्या मोहगाव झिल्पी या गावात साधारण १० वर्षांपुर्वी खजूराची लागवड केली होती. ही शेती पाहण्यासाठी अनेक ठिकाणाहून पर्यटक येत असतात. त्यांनी तामिळनाडू येथे जाऊन खजूर शेतीचे प्रशिक्षण घेतले होते.

त्यांनी तेथूनच रोपे मागवली आणि दिड एकरात या रोपांची लागवड केली होती. त्यातल्या खजूर पिकाला कमी पाणी लागते आणि उष्ण हवामान पोषक असते. त्यामुळे त्यांना विदर्भातील वातावरणाचा फायदा झाला.

ठिबक सिंचनाने त्यांनी शेतीला पाणी पुरवले आणि शेणखत दिले. सातव्या वर्षी त्यांना उत्पादन मिळण्यास सुरूवात झाली. सेवी थंगवेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, खजूराच्या एका झाडापासून त्यांना ३०० किलोपर्यंतचे उत्पादन मिळते.

सध्याचा भाव जर बघितला तर ओल्या खजूराचा प्रतिकिलोचा दर ७०० ते १००० रुपये किलो आहे. त्यावरून तुम्ही त्यांच्या उत्पन्नाचा अंदाज लावू शकता. लागवड करताना त्यांनी २५ बाय २५ अंतरावर ३ बाय ३ चा खड्डा खणला होता.

त्यामध्ये शेणखत आणि माती टाकून रोपांची लागवड केली होती. दोन झाडांच्या मध्ये तुम्ही दुसरी पिकेही लावू शकता असे सेवी थंगवेल यांनी सांगितले आहे. सध्या सगळीकडे त्यांच्या या खजूर शेतीचीच चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या
‘तुम्ही कॅशिअर म्हणून कामाला लागल्या, बॅंकेच्या उपाध्यक्ष झाल्या’; कमेंटवर संतापल्या अमृता फडणवीस
बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! स्टेट बँकेत पाच हजार जागांची बंपर भरती; जाणून घ्या कसा कराल अर्जशरद पवारांनाही या गावाला भेट देण्याचा मोह आवरला नाही, वाचा खानजोडवाडीची यशोगाथा
सुजय विखेंनी दिल्लीवरून आणलेल्या इंजेक्शनप्रकरणी हायकोर्ट आक्रमक, कारवाईचे दिले आदेश  

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.