Share

महाराष्ट्र देखील लखनौ, वाराणसी या ठिकाणी कार्यालय उघडणार- संजय राऊत

योगी आदित्यनाथ यांनी नुकतेच उत्तर प्रदेश सरकारचे मुंबईमध्ये कार्यालय सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा केलेली आहे. राजकीय वर्तुळात याची मोठया प्रमाणात चर्चा सुरु आहे. उत्तर प्रदेशातील स्थलांतरित नागरिकांची सुरक्षा, रोजगार,पर्यटन,मूळ राज्यात गुंतवणूक, इ समन्वय साधला जावा या भूमिकेतून हे कार्यालय सुरु करण्यात येणार आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याविषयी बोलताना महाराष्ट्र देखील लखनौ, वाराणसी या ठिकाणी कार्यालय उघडणार असल्याचं सांगितले आहे. याविषयी बोलताना राऊत पुढे म्हणाले आहेत की , संपूर्ण देश एक आहे असं आपण म्हणतो तर मग आपण कोणत्याही राज्यात जाऊ येऊ शकतो यामुळे अयोध्येत जाऊन एक सेन्टर उभं करणार आहोत मुख्यमंत्रांनी देखील तशी घोषणा केलेली आहे.

तसेच हा खाजगी किंवा सरकारी विषय नाही असं देखील संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत. पंतप्रधान मोदींनी देखील याविषयी सांगितलं असल्याचं राऊत यांनी म्हटले आहे . यावेळी बोलताना संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहे .

मोतीलाल ओसवाल आणि कंपनी शेअर बाजार कंपनी मध्ये तब्बल ५ हजार ६०० कोटींचा घोटाळा झालेला होता. या घोटाळ्यात तुमचा संबंध आहे, याविषयी तुम्ही खुलासा केलेला नाही यावर तुमचे काय उत्तर आहे. युवक प्रतिष्ठान हे फक्त ब्लॅक मनी व्हाईट करण्याच काम करतात.

यामुळे आता याचा तपास करण्याची ईडीला मागणी करणार असल्याचं संजय राऊत यांनी यावेळी सांगितले आहे. याचसोबत भाजपच्या लोकांचे जेवढे भ्रष्टाचार प्रकरण आहेत ते आम्ही बाहेर काढू. किरीट सोमय्या यांचे प्रकरण उघडकीस आले आहे. याचा खेळ आता संपला आहे.

त्यांनी सुरवात केली,आम्ही शेवट करू असं देखील संजय राऊत यांनी यावेळी म्हटले आहे. दरम्यान हे प्रकरण किरीट सोमय्या यांचेच नाही तर भाजपच्या २८ लोकांची प्रकरणे आहेत आणि हा राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीचा विषय असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलय.

महत्वाच्या बातम्या
मुंबईच्या संघात स्थान नाही म्हणून अर्जून तेंडूलकरला करावं लागतंय ‘हे’ काम, चाहते पण हैराण
राज साहेबांच्या केसाला जरी धक्का लागला तर.., राज ठाकरेंना धमकी आल्यानंतर मनसे आक्रमक
‘तो’ फोटो शेअर करत केदार शिंदेंनी राज ठाकरेंंचे केले कौतुक, म्हणाले, ‘एक अव्वल कलाकार’
निलेश राणेंचा थेट पवारांवर हल्लाबोल; ‘५० वर्ष आमदार, एवढ्या वर्षात काय केलं?’

 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now