मोठी बातमी! महाराष्ट्र सदन प्रकरणी छगन भुजबळ यांना क्लीनचीट

अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी क्लीनचीट मिळाली आहे. छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळ, तन्वीर शेख, इम्रान शेख, गीता जोशी, संजय जोशी यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. यानंतर भुजबळांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

पत्रकार परिषदेत ते म्हणाले,” महाराष्ट्र सदन प्रकरण हे संपूर्ण जगभर गाजले. महाराष्ट्र सदन हे फाईव्ह स्टार हॉटेलसारखं बांधण्यात आलं. गेल्या ८ वर्षांपासून देशातील सर्व पक्ष त्याचा वापर करतात. त्याठिकाणी सर्व फर्निचरसह आपण व्यवस्था केली आहे. ते बांधून दिल्यानंतर १०० कोटी रुपयांचा एफएसआय किंवा जमीन कंत्राटदाराला देऊ असे सांगितले होते.

मात्र, आतपर्यंत कंत्राटदाराला काही मिळाले नाही. तरी आमच्यावर आरोप करण्यात आले. ८०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला. आणि त्यातून प्रॉपर्टी खरेदी केल्या अशा प्रकारचे खोटेनाटे आरोप आमच्यावर लावण्यात आले. मिडीया ट्रायल सुद्धा झाली. त्यानंतर ईडीची कारवाई सुद्धा झाली.

शेवटी आम्हाला दोन पेक्षा जास्त काळ तुरुंगात राहावं लागलं. गेल्या वर्षभरात सत्र न्यायालयात केस सुरु होती. आणि यामध्ये आम्हाला वगळण्यात यावं त्यात आमचा काही दोष नाही, अशी मागणी आम्ही केली होती. आता न्यायालयाने आम्हाला दोषमुक्त घोषित केले. असं पत्रकार परिषदेत ते म्हणाले.

वकिलांनी सत्य काय आहे हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यामध्ये एकही पैसा कोणाला मिळाला नाही. आणि म्हणून आम्हाला निर्दोष म्हणून मुक्त करण्यात आलं. आता ईडीची कारवाई महाराष्ट्र सदनमध्ये ८०० कोटी घोटाळ्याप्रकरणी संबंधित आहे. त्यातूनही दिलासा मिळेल.

त्यावेळी ही मी म्हटलं होत “सत्य परेशान हो सकता हे लेकिन पराजित नही.” आज ना उद्या न्याय मिळेल अतिशय विनम्रपणे आणि संयमपूर्वक आम्ही या यशाचा स्वीकार करत आहोत. कोणाच्याही बद्दल आमच्या मनामध्ये कुठलीही द्वेषबुद्धी नाही. कोणाबद्दलही तक्रार नाही. काहीवेळा नियतीच्या मनात जे असत ते घडतं. दिवस येतात ते भोगावे लागतात. आमच्या वाट्याला आले, आम्ही त्याला तोंड दिले, असं यावेळी ते म्हणाले.

 

महत्वाच्या बातम्या
भारताने नाकारलेल्या उन्मुक्त चंदची अमेरीकेत तुफानी खेळी; ठोकल्या तब्बल ३०४ धावा
सलाम! गरीबांच्या लेकरांना शिकवण्यासाठी रोज २५ किमीचे डोंगर पार करून जाते ही शिक्षीका
अमेरिकेच्या रॅपरला लाईव्ह शोमध्ये एका झटक्यात बसला १७४ कोटींचा फटका; वाचा नक्की काय घडलं
८३ वर्षे वय असतानाही रतन टाटा शिकताय ‘ही’ गोष्ट; टाटांची शिकण्याची आवड बघून लोकंही झाले हैराण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.