Share

Maharashtra Weather Update : मराठवाडा, विदर्भात पुढील २४ तासांत कसं राहील हवामान? जाणून घ्या राज्यात कुठे किती पडणार पाऊस…

Maharashtra Weather Update : राज्यात यंदाचा मान्सून वेगात दाखल झाल्यानंतर सलग दोन आठवडे सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली. विशेषतः विदर्भ भागात अतिवृष्टी झाल्याने अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आणि काही जिल्ह्यांत पूरसदृश स्थिती उद्भवली होती. मात्र सध्या पावसाचा जोर ओसरला असून स्थिती हळूहळू सामान्य होत आहे.

विदर्भात पावसाचा जोर ओसरला; यलो अलर्ट कायम

विदर्भात (Vidarbha) मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते, तसेच काही भागांत पूल वाहून गेले. पूरस्थितीमुळे काही शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. सध्या पाऊस थोडा शांत झाला असून हवामान विभागाने येथे यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. काही भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह हलकासा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोकण, मराठवाडा व घाट प्रदेशात हवामान कसं असेल?

गेल्या २४ तासांत कोकण (Konkan) आणि पश्चिम घाट भागात हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. पुढील काही दिवसही अशाच स्वरूपाचे वातावरण राहील, असं हवामान खात्याने (IMD) सांगितले आहे.

मराठवाड्यात (Marathwada) देखील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील आणि हलकासा ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज आहे. याशिवाय, उत्तर मध्य महाराष्ट्रातील (North Madhya Maharashtra) घाट परिसरात काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे.

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसामध्ये खंड

झारखंड (Jharkhand) भागात समुद्रसपाटीपासून अंदाजे ५.८ किमी उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राजस्थान (Rajasthan) पासून बंगालच्या उपसागरापर्यंत (Bay of Bengal) कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर जाणवत आहे आणि त्यामुळेच अनेक भागांमध्ये पावसामध्ये उघडीप झाली आहे.

शेतकऱ्यांना दिलासा, शेतीकामांना वेग

कोकणात पावसाचा जोर कमी झाला असला तरी वातावरण ढगाळ आहे. या दरम्यान भात लागवडीला जोर मिळाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra) आणि मराठवाडा भागात खुरपणी आणि मशागत यांसारख्या शेतीकामांना वेग आला आहे.

 

 

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now