महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर तौक्ते वादळाचा हाहाकार; कोकण किनारपट्टीचे मोठे नुकसान

महाराष्ट्रात तौक्ते चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. ह्या चक्रीवादळाचा सगळ्यात मोठा फटका कोकण किनारपट्टीला बसला आहे. तौक्ते वादळामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर बसला आहे.

तौक्ते वादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यात अनेक झाडांचे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्ग मध्ये पण जवळपास १००पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले आहे. हे वादळ आता रायगड आणि रत्नागिरीच्या दिशेने जात आहे.

ह्या वादळामुळे किनारपट्टीच्या भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर हे चक्रीवादळ मोठ्या प्राणावर घोंगावत आहे. या वादळाने ‘व्हेरी सीव्हियर सायक्लॉनिक स्टॉर्म’ म्हणजे अतितीव्र वादळाची पातळी गाठली आहे.

उंबाईच्या वादळाच्या तयारीबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे की “तौक्ते चक्रीवादळ गोव्याहून पुढे सरकून रत्नागिरीच्या जवळ आले आहे. आम्ही सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. या चक्रीवादळामुळे मोठी समस्या निर्माण होऊ शकते. समुद्र किनाऱ्याजवळ लाईफगार्ड्स तैनात करण्यात आलेत.”

महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून तौक्ते चक्रीवादळ दोनशे ते तीनशे किलोमीटरच्या वेगाने वाहत होते. वादळाच्या प्रभावामुळे किनारी प्रदेशात वेगवान वारे वाहण्याची आणि मुसळधार पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यात पण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात चक्रीवादळासंदर्भात उपाययोजनांसाठी ‘वॉर रूम’ कार्यक्रम करण्यात आली आहे. रत्नागिरी शहरात वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पण चक्रीवादळाचा फटका बसला आहे. त्यामुळे १३७ घरांची चक्रीवादळात पडझड पण झाली आहे.

ताज्या बातम्या
महाराष्ट्रासाठी आजचा दिवस सतर्कतेचा, ताऊते चक्रीवादळ राज्यावर धडकणार; ‘अशी’ घ्या काळजी
भयावह! उत्तरप्रदेशात गंगाकिनारी विदारक स्थिती, जिकडे पहावे तिकडे वाळूत पुरलेल्या मृतदेहांचा खच

सुप्रीम कोर्टानंतर आता रघुराम राजन यांनी केंद्राला झापले, म्हणाले, महाराष्ट्राला जमले मग देशाला का नाही?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.