सध्या देशात इंधनाचे दर वाढत आहेत. या इंधन दरवाढीवरून विरोधकांनी मोदी सरकारवर टीका देखील केली होती. आज पंतप्रधान मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली होती. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी(PM Modi) इंधन दरवाढीवरून ठाकरे सरकारला सुनावले आहे. महाराष्ट्राने पेट्रोल आणि डिझेलचा दर कमी करावा, असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.(Maharashtra should reduce fuel tax, Prime Minister Modi told the Thackeray government)
आज पंतप्रधान मोदींची देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी इंधन दरवाढीवरून बिगर भाजपशासित राज्यांना सुनावलं आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी बिगर भाजपशासित राज्यांच्या सरकारवर टीका केली आहे.
या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “मी कोणावरही टीका करत नाही. मी सर्व राज्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो. महाराष्ट्र, पंजाब, पश्चिम बंगाल, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू आणि झारखंड या राज्यांनी इंधनाच्या दराबद्दल दिलेल्या केंद्रांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. त्याचा नागरिकांवर बोजा पडत राहिला”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “भारताची अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य असणे आवश्यक आहे. आम्ही काही महिन्यांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. आम्ही राज्यांना देखील उत्पादन शुल्क कमी करण्याची विनंती केली होती. पण काही राज्यांनी उत्पादन शुल्क कमी केले नाही.”
“त्यामुळे काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत. हा एकप्रकारे राज्यातील नागरिकांवर अन्याय केल्यासारखं आहे. यामुळे इतर राज्यांचे देखील नुकसान होत आहे. गुजरात, कर्नाटकने इंधनावरील उत्पादन शुल्क कमी केले आहे. पण महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, पंजाब, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू आणि झारखंड या राज्यांनी इंधनावरील कर कमी केले नाहीत”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
पंतप्रधान मोदींनी केलेल्या या वक्तव्यानंतर केंद्र आणि बिगर भाजपशासित राज्यांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालने इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्यास नकार दिला होता. इंधनावरील उत्पादन शुल्क कमी केल्यास मोठ्या प्रमाणात राज्याचा महसूल बुडतो, असे राज्य सरकारमधील अधिकाऱ्यांनी सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या :-
‘देशातील १२३ कोटी लोकांचा रक्तगट हा छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराज हाच असला पाहिजे’
लेकाला वाचवण्यासाठी मारली उडी अन् पोराने मारली मिठ्ठी; अन् झालं होत्याच नव्हतं, वाचा सविस्तर
नवनीत राणांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे उघड, तरी त्यांना का वाचवलं जातय? आता भाजप गप्प का?