राज्यात तूर्तास लाॅकडाऊन नाही, पण…; राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

‘राज्यात तुर्तास लॉकडाऊन करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, आपली सर्व चर्चा त्याच दिशेने सुरु आहे. पण याचा अर्थ लॉकडाऊन लागेलच, असा नाही. पण सरकारला तशी तयारी करुन ठेवणे हे गरजेचे असते, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

सध्या २ एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र या चर्चा टोपे यांनी फेटाळून लावल्या आहेत. लॉकडाऊनसंदर्भात तुर्तास तरी चर्चा सुरु आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

‘राज्यातील लोक १५ दिवस गर्दीच्या ठिकाणी गेलेच नाहीत तर कोरोनाची साखळी तुटू शकते. मात्र, त्यामुळे अनेकांच्या रोजगाराची समस्या उद्भवते. परिणामी आम्ही लॉकडाऊन हा सर्वात शेवटचा पर्याय ठेवला आहे. शेवटी जीव वाचवायचा असेल तर लॉकडाऊन करणे भागच आहे, असेही टोपे म्हणाले.

‘वर्क फ्रॉम होम’साठी राज्य सरकारची चाचपणी
‘वर्क फ्रॉम होम’साठी राज्य सरकारची चाचपणी सुरु आहे. लॉकडाऊनपेक्षा जास्तीत जास्त लोकांना घरी बसून कसं काम करता येईल यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. याबद्दल राज्य सरकार सर्व खाजगी कंपन्यांना आदेश देण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

किशोर कुमारच्या पत्नीसोबत रोमान्स करणे जितेंद्रला पडले महागात; किशोर कुमारने दिली होती धमकी

‘रजनीकांत यांना निवडणुकीमुळे पुरस्कार दिलाय का?’; प्रकाश जावडेकर संतापले

रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा फोन; राजकीय चर्चांना उधाण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.