मुंबई | राज्य सरकारने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. यानंतर आता त्यांची सुरक्षा ‘महाराष्ट्र रक्षक’ करणार आहेत. ठाकरेंच्या सुरक्षेसाठी मनसेचे सरचीटणीस नयन कदम यांनी टीम तायर केली आहे.
राज्य सरकारने १० जानेवारीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली होती. तसेच यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही झेड दर्जाची सुरक्षा काढून घेऊन त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली. यानंतर मात्र मनसेच्या अनेक नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. याबाबत राज्य सरकारवर जोरदार टीकाही करण्यात आली होती.
दरम्यान, आम्हाला सरकारच्या सुरक्षेची गरज नसून राज ठाकरे यांच रक्षण करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असे मनसेच्या नेत्यांनी म्हटले आहे. त्यानंतर तडकाफडकी मनसे स्टाईलमध्ये मनसे सरचीटणीस नयन कदम यांनी राज यांच्या संरक्षणासाठी खास ‘महाराष्ट्र रक्षक’ नाव असलेली टीम तयार केली आहे. ही टीम सतत राज ठाकरे यांच्यासोबत सुरक्षेसाठी असेल असे त्यांनी सांगितले आहे.
‘महाराष्ट्र रक्षक’ ही टीम मनसेने तयार केली. याचे काम हे राज ठाकरे यांची सुरक्षा करणे हे असणार आहे. काळे टी-शर्ट घातलेले हे मनसे सैनिक राज ठाकरे यांच्या आजूबाजूला दिसून येणार आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्यावर आणि बैठकांना ही टीम त्यांच्यासोबत असेल.
महत्वाच्या बातम्या-
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंसह ‘या’ नेत्यांच्या सुरक्षेत मोठी कपात
“फडणवीसांची लोकप्रियता सरकारला खुपते म्हणूनच आकसबुद्धीने सुरक्षा कपातीचा निर्णय घेतला”
…..म्हणून माझ्या सुरक्षेत कपात केली असावी; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया