Maharashtra Rains : महाराष्ट्रात आज पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
शहरांत व ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक भागांत पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच आज हवामान विभागाने नवे इशारे दिले आहेत. अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने स्थानिक प्रशासनांनी सज्जतेच्या सूचना दिल्या आहेत.
मुसळधार पावसाचा इशारा:
रेड अलर्ट म्हणजे अतिमुसळधार पावसाची शक्यता, डोंगराळ भागात भूस्खलन, नाल्यांना पूर, शेतजमिनींमध्ये पाणी साचण्याची भीती. आज रेड अलर्ट खालील जिल्ह्यांना देण्यात आला आहे. रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), पुणे घाटमाथा (Pune Ghat areas), सातारा घाटमाथा (Satara Ghat areas), भंडारा, गोंदिया (Gondia), गडचिरोली, चंद्रपूर (Chandrapur) या भागांत नदी-नाल्यांमध्ये पाणी वाढण्याची शक्यता आहे. प्रवास टाळण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
जोरदार पावसाचा इशारा :
ऑरेंज अलर्ट म्हणजे मुसळधार पावसाची शक्यता आणि जीवनमानावर परिणाम होण्याची शक्यता. हे जिल्हे आहेत. मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), सिंधुदुर्ग (Sindhudurg), कोल्हापूर घाटमाथा, वर्धा, नागपूर (Nagpur) या भागांमध्ये वाहतूक विस्कळीत होण्याची, झाडं उन्मळण्याची आणि विजेच्या खांबांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
पालघर, नाशिक घाटमाथा, सातारा (Satara – plains), कोल्हापूर (Kolhapur – plains), अमरावती, हिंगोली (Hingoli), नांदेड (Nanded) या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी शेती कामं नियोजनबद्ध करण्याचा सल्ला दिला जात आहे.
विजांसह पावसाचा इशारा
विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता असलेले भाग. जालना (Jalna), परभणी (Parbhani), बुलडाणा, अकोला (Akola), वाशीम, यवतमाळ (Yavatmal) या भागांत विजा कोसळण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी झाडांखाली थांबणे, ओले वायर, विद्युत उपकरणे यापासून दूर राहण्याच्या सूचना हवामान विभागाने केल्या आहेत.
राज्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर आहेत. शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामात काळजी घ्यावी, नागरिकांनी गरज नसताना प्रवास टाळावा, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने (State Disaster Management Department) केलं आहे. घाटमाथ्याच्या भागात विशेष लक्ष देण्याची गरज असून वाहनचालकांनी विशेष दक्षता बाळगावी.