Share

Weather Update: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय, राज्यभरात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Weather Update: गेल्या काही दिवसांपासून पावसाची चाहूल मंदावली होती, पण पुन्हा एकदा निसर्ग रौद्र रूप दाखवायला सज्ज झालाय. हवामान खात्यानं सांगितलंय की अरबी समुद्रात (Arabian Sea) तयार झालेला कमी दाबाचा पट्टा पुन्हा सक्रिय झालाय. त्यामुळे राज्यभर पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढणार आहे.

हवामान विभागाचा अंदाज

अरबी समुद्राच्या ईशान्य भागात कमी दाबाची परिस्थिती निर्माण झाली असून ती हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहे. याशिवाय बंगालचा उपसागर (Bay of Bengal) देखील पावसासाठी पोषक बनत असल्याने मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेलीय. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 60 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो.

कुठे कधी पाऊस?

१० सप्टेंबर : अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली – येलो अलर्ट.

११ सप्टेंबर : सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली – येलो अलर्ट.

१२ सप्टेंबर : पुणे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली आणि संपूर्ण विदर्भ – येलो अलर्ट.

१३ सप्टेंबर : मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली तसेच संपूर्ण विदर्भ – येलो अलर्ट.

१४ सप्टेंबर : मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम – येलो अलर्ट.

मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक राहणार असून विदर्भ आणि कोकणातही वादळी पावसाची परिस्थिती तयार होईल. काही भागात ढगाळ वातावरण कायम राहील. शेतकऱ्यांनी या काळात शेतीसंबंधी कामे नियोजनबद्ध पद्धतीनं करावीत, असा सल्लाही हवामान खात्याने दिलाय.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now