Maharashtra Politics: महाराष्ट्रातील शिवसेना (Shivsena) आणि मनसे (MNS) या पक्षांच्या नेत्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचा उल्लेख करत म्हटलं, “स्वतःच्या मुलांना इंग्रजी शाळेत घालायचं आणि भारतीय भाषांवर टीका करायची, ही दुहेरी भूमिका म्हणजे पाखंडीपणा आहे.”
फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर अनेकांची उत्सुकता लागून राहिली की, राज्यातील प्रमुख नेत्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची शालेय शिक्षण कोणत्या शाळांमधून झालंय. चला तर मग जाणुन घेऊया.
शिवसेना (ठाकरे गट):
-
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) – मुंबई (Mumbai) येथील बालमोहन विद्यामंदिर (Balmohan Vidya Mandir)
-
आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) – बॉम्बे स्कॉटिश स्कूल (Bombay Scottish School), माहिम (Mahim)
पुढील शिक्षण: सेंट झेवियर्स कॉलेज (St. Xavier’s College), फोर्ट (Fort)
व के.सी. लॉ कॉलेज (KC Law College), चर्चगेट (Churchgate) -
तेजस ठाकरे (Tejas Thackeray) – बॉम्बे स्कॉटिश स्कूल (Bombay Scottish School)
पुढे: जय हिंद कॉलेज (Jai Hind College)
मनसे :
-
राज ठाकरे (Raj Thackeray) – मुंबईतील बालमोहन विद्या मंदिर (Balmohan Vidya Mandir), दादर (Dadar)
-
अमित ठाकरे (Amit Thackeray) – आर.ए. पोदार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स (RA Podar College of Commerce and Economics), मुंबई (Mumbai)
भाजप:
-
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) – सरस्वती विद्यालय (Saraswati Vidyalaya), नागपूर (Nagpur)
-
दिविजा फडणवीस (Divija Fadnavis) – कैथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल (Cathedral and John Connon School), मुंबई (Mumbai)
शिवसेना (शिंदे गट):
-
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) – ठाणे महापालिकेची शाळा क्र. २३, किसननगर (TMC School No. 23, Kisan Nagar, Thane)
-
श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) – मिथिला इंग्लिश हायस्कूल (Mythila English High School), किसन नगर-३ (Kisan Nagar-3, Thane)
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट):
-
शरद पवार (Sharad Pawar) – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (Maharashtra Education Society), बारामती (Baramati)
पुढील शिक्षण पुणे (Pune) व नगर (Nagar) येथे -
अजित पवार (Ajit Pawar) – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर, मुंबई (MES, Kolhapur, Mumbai)
-
सुप्रिया सुळे (Supriya Sule) – सेंट कोलंबा स्कूल (St. Columba School), मुंबई (Mumbai)