Share

Maharashtra Politics: शरद पवारांसोबत अजितदादांनाही भाजपचा जबरदस्त दणका, जाणून घ्या नेमकं केलं तरी काय…

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. अशाच पार्श्वभूमीवर आज काही प्रमुख नेत्यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करत राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party – NCP) आणि इतर विरोधी गटांना मोठा धक्का दिला आहे.

अपूर्व हिरे यांचा अधिकृत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अपूर्व हिरे (Apoorva Hire) यांनी अखेर भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात शेकडो समर्थकांसह त्यांनी हा प्रवेश केला. या वेळी भाजपचे नव्याने नियुक्त प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) उपस्थित होते.

डॉ. हिरे (Apoorva Hire) यांनी स्पष्ट केलं की, “ग्रामीण आणि शहरी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपचा विकासाभिमुख दृष्टिकोन महत्त्वाचा वाटतो, म्हणूनच मी हा निर्णय घेतला.”

सावकार मादनाईक भाजपात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला धक्का

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatna) ज्येष्ठ नेते व माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांचे विश्वासू सहकारी सावकार मादनाईक (Savkar Madanaik) यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे. मादनाईक हे चळवळीतून आलेले कार्यकर्ते असून, 2002 पासून शेट्टींसोबत काम करत होते.

भाजप प्रवेशामागे माधवराव घाटगे (Madhavrao Ghatge) यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. मुंबईत यासाठी खास बैठकांचे आयोजन झाले होते. भाजपकडून मादनाईक यांना पक्षात घेण्याबाबत सकारात्मक भूमिका होती, जी आज प्रत्यक्षात उतरली.

प्रवीण माने यांचा पवार कुटुंबाला झटका

शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचे समर्थक आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर (Indapur) तालुक्यात प्रभावी असलेले नेते प्रवीण माने (Pravin Mane) यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांनी याआधी अपक्ष म्हणून विधानसभा निवडणुकीत ४०,००० मतांची आघाडी मिळवली होती.

प्रवेशानंतर बोलताना माने म्हणाले, “भाजपमध्ये सामील होणं हे माझ्या राजकीय आयुष्यातील सुवर्णक्षण आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी हा निर्णय घेतला आहे.” राज्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या विकासकामांनी प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

या सर्व घडामोडी पवार कुटुंबासाठी (Pawar Family) मोठा राजकीय झटका मानल्या जात आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार आणि दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील ज्येष्ठ नेते भाजपात प्रवेश करत असल्याने, आगामी निवडणुकीत या पक्षांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now