बबड्या खरंच सुधारलाय…?; मास्क वापरायला सांगण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचं जबरदस्त ट्विट्

मुंबई | महाराष्ट्रतील जनतेला एखाद्या नियमाचं पालन करायला सांगायचं असेल तर महाराष्ट्र पोलीस नेहमीच काहीतरी विशेष ट्वीट शेअर करत असतात. सध्या कोरोनाचं सावट असल्याने जनजागृतीसाठी एक विशेष ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे.

महाराष्ट्र पोलिसांनी एक ट्विट करताना चक्क ‘झी’ मराठीवरील  एका प्रसिद्ध  मालिकेतील पात्राचं उदाहरण दिलं आहे. हे पात्र म्हणजे सध्या सगळ्यांच्याच चर्चेचा विषय असलेला बबड्या हे आहे. ‘अग्गंबाई सासुबाई’ मालिकेतील आसावरीच्या बबड्याचं मिम पोलिसांनी शेअर केलं आहे.

सध्या ‘अग्गंबाई सासुबाई’ मालिकेची बरीच चर्चा होत आहे. खासकरून बबड्याच्या चित्रविचित्र वागण्यावरून अनेक  मीम्स व्हायरल केले जातात. याचाच आधार घेत पोलिसांनी बबड्याचे उदाहरण देत मीम तयार केलं आणि ते ट्वीट केलं.

या फोटोत बबड्याचा एक मास्क घातलेला फोटो शेअर करत तो एक जबाबदार नागरिक असल्याचं या मिममध्ये म्हटलं आहे. बबड्याचे प्रताप आणि वागण्याची पद्धत सगळयांनाच माहिती आहे.

विशेष म्हणजे बबड्या आता सुधारल्याचं या मालिकेत दाखवण्यात आलं आहे. बबड्या चांगला की वाईट आम्हाला ठाऊक नाही परंतु बबड्या एक जबाबदार नागरिक नक्कीच आहे. असं या ट्विटच्या माध्यमातून पोलिसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, या मेमच्या माध्यामातून जनतेला मास्क वापरण्याचे आवाहन महाराष्ट्र पोलिसांकडून करण्यात येत आहे. पोलिसांच्या या मीमचा नेमका उद्देश फक्त जनतेने मास्क वापरावे हाच आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.