कार्याला सलाम! महाराष्ट्र पोलीस रेहाना बनल्या कोरोना संकटात सापडलेल्या ५० मुलांच्या आई

मुंबई । कोरोनाच्या काळात अनेक माणसांनी आपले जीव गमावले आहेत. अनेक लोकांनी या काळात आपल्या जवळचे माणसे गमावले आहेत. तर लॉकडाउनमध्ये अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा भयानक परिस्थितीमध्ये माणुसकीच्या नात्याने अनेक हात मदतीसाठी पुढे येत आहेत.

कोरोना काळात असाच एक मदतीचा हात महिला पोलीस कॉन्स्टेबल रेहाना शेख यांनी केला आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना, त्यांनी ऑक्सिजन, रक्त, प्लाझ्मा पुरवला आहे, ४० वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबल रेहाना यांनी एकूण ५० विद्यार्थ्यांच्या १०वी पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी स्वताच्या खांद्यावर घेतली आहे. यामुळे त्यांचे सगळ्याकडून कौतुक होत आहे.

रेहाना म्हणाल्या, ‘गतवर्षी आम्ही माझ्या मुलीच्या वाढदिवसाची तयारी करत असतानाच मला रायगड जिल्ह्यातील वाजे तालुक्यात असलेल्या ज्ञानी विद्यालयाबाबत माहिती मिळाली. मी तेथील मुख्याध्यापकांशी संपर्क साधला असता त्यांनी शाळेला भेट देण्याचे निमंत्रण दिले. तिथे गेल्यानंतर मला समजले की या मुलांना आपल्या मदतीची गरज आहे. येथील सर्व विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती बेताची असून काहींच्या पायात चप्पल सुद्धा नाही.

मी माझ्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जमवलेले पैसे या मुलांच्या शिक्षणासाठी वापरण्याचा निर्णय घेतला. आपल्या समाजकार्याच्या प्रेरणेमागे २०२० मध्ये घडलेली एक घटना असल्याचे त्यांनी सांगतात. ‘माझ्या एका पोलीस सहकाऱ्याने मला गतवर्षी, आपल्या आईसाठी एक इंजेक्शन लागत असल्याचे सांगून त्यासाठी मला मदत मागितली.

मी लगेच काही ओळखीच्या लोकांना फोन करत ते मिळवून दिले. आपल्यामुळे कोणाला तरी मदत झाली हा अनुभवच माझ्या समाज कार्यामागील प्रेरणा ठरला, असे त्यांनी सांगितले. रेहाना शेख यांच्या या कार्यासाठी त्यांचा महाराष्ट्र पोलिसांतर्फे सत्कार करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी उत्कृष्ट सामाजिक कार्य केल्याबाबत त्यांचा सत्कार केला. कोरोना काळात ही माणुसकी जिवंत आहे, याचे चांगले उदाहरण रेहाना शेख आहे.

ताज्या बातम्या

पाणी प्यायला गेलेल्या हत्तीमध्ये आणि मगरीमध्ये जुंपली, पहा थरारक भांडणाचा व्हिडिओ

अभिनेत्री प्रत्युषाच्या मृत्यूनंतर ५ वर्षांनी विकास गुप्ताने केला मोठा खुलासा; म्हणाला, मी तिच्यासोबत..

VIDEO, काय म्हणावं या पोराला! मेट्रोमध्ये सीट मिळवण्यासाठी तरुणाचा भन्नाट जुगाड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.