शरद पवारांचे पीए ते महाराष्ट्राचे गृहमंत्री; दिलीप वळसे पाटलांचा थक्क करणारा राजकीय प्रवास

महाराष्ट्राच्या गृहमंत्रिपदासाठी आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचं नाव जाहीर झाले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावरच गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचे शरद पवार आणि राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आले आहे. वळसे पाटलांकडील उत्पादन शुल्क खाते अजित पवारांकडे दिले आहे.

दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांचे विश्वासू नेते आहेत. तसेत त्यांची प्रतिमाही स्वच्छ आहे. तसेच ते मिडीयाशी जास्त बोलतही नाहीत. ह्या बाजू त्यांच्या जमेच्या आहेत. असं म्हटलं जातय की शरद पवारांची पहीली पसंती वळसे पाटलांनाच होती.

दिलीप वळसे पाटलांची सुरुवात शरद पवार साहेबांचे पीए म्हणून झाली. १९९० साली पहिल्यांदा आंबेगाव तालुक्याचे आमदार म्हणून निवडून आले. तेव्हापासून आजतागायत हा मतदारसंघ त्यांनी राखला आहे. राज्य सरकारमध्ये त्यांनी वेळोवेळी विविध मंत्रीपदे भूषवली. अभ्यासू नेता म्हणून कायम छाप पाडली. आता ते थेट राज्याचे गृहमंत्री बनले आहेत.

dilip valse Patil

दिलीप वळसे पाटील यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1956 रोजी झाला. 1990 साली आंबेगाव तालुक्‍यात युवा नेतृत्व म्हणून दिलीप वळसे-पाटील यांचा उदय झाला. वडील दत्तात्रेय गोविंदराव वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाची सुरुवात केली. दिलीप वळसे हे राष्ट्रवादीमधून आंबेगाव तालुक्यातून तब्बल सात वेळा आमदार म्हणून निवडून आले.

त्यांचे वडील माजी आमदार दत्तात्रेय वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाची सुरुवात केली. आजपर्यंत सलग सात वेळा विजय मिळवून तीस वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. युतीचे सरकार असताना विधानसभेत चमकदार कामगिरी केल्याने त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार पण मिळाला आहे.

एकेकाळी दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबेगाव विधानसभा मतदार संघाचा कायापालट त्यांनी केला. त्यासाठी वळसे पाटील यांनी  डिंभे धरण या निधीअभावी रेंगाळलेल्या कामाला प्राधान्य दिले. निधी उपलब्ध होण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडे पाठपुरावा केला.

दिलीप वळसे पाटील यांनी अवसरी खुर्द येथे शासकीय अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन हि दोन महाविद्यालये व घोडेगाव येथे आय टी आय प्रशिक्षण संस्था सुरु केली. विकासाची कामे मोठ्या प्रमाणात त्यांनी केली आहेत. त्यामुळे ते आतापर्यंत चढत्या मताधिक्याने विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले आहेत.

वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ऊर्जा, उत्पादन शुल्क, कामगार विभागासारख्या महत्त्वाचे खात्यांचे मंत्री म्हणून काम सांभाळले आहे. 2009 ते 2014 या कालखंडात त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली होती.

 १४ ऑगस्ट २०१७ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्ष पदावर त्यांची निवड झाली. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पदभार स्विकारल्यानंतर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती.राजकीय उलथापालथीच्या काळात आणि भाजपकडून आक्रमकपणे हल्ला होत असताना विधानसभा अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांचे विश्वासू नेते आहेत. तसेत त्यांची प्रतिमाही स्वच्छ आहे. तसेच ते मिडीयाशी जास्त बोलतही नाहीत. ह्या बाजू त्यांच्या जमेच्या आहेत. असं म्हटलं जातय की शरद पवारांची पहीली पसंती वळसे पाटलांनाच होती. आता राज्याच्या गृहमंत्रीपदी निवड झाल्यानंतर ते कसे काम करतात हे पाहणे महत्वाचे ठरेल. Dilip Walse Patil, Sharad Pawar, Home minister Dilip Walse Patil

महत्वाच्या बातम्या
आंबेगावचे सुपुत्र शरद पवारांचे सर्वात विश्वासू दिलीप वळसे पाटील झाले महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री
अनिल देशमुख तुम्ही पॉवरफुल मराठा नेते असाल तरी तुम्ही कायद्यापेक्षा व संविधानापेक्षा मोठे नाही
कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी स्वत:ला झोकून द्या; शरद पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.