महाराष्ट्राच्या मंत्र्यांचे ब्रेन लॉक तर जनता झाली अनलॉक; भाजप नेत्याचा ठाकरे सरकारवर निशाणा

मुंबई | भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी लॉकडाऊनच्या मुद्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांचे ब्रेन लॉक झाले आहे. अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

पुढे त्यांनी असेही सांगितले की, महाराष्ट्रात भाजपचे सरकार असते तर कोरोनाची अशी परिस्थिती निर्माण झाली नसती. ठाकरे सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे.

सुजय विखे पाटील पुढे असेही म्हणाले की, मंत्र्यांचे ब्रेन लॉक झालेले आहे, तर जनता अनलॉक झाली आहे. या सगळ्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबईमध्ये देखील सरकारने मिस-मॅनेजमेंट केले. मला असे वाटते की, ही नैसर्गिक आपत्ती आहे. मात्र तरीदेखील दुसरी कोणती पार्टी असती तर अशी अवस्था झाली नसती.

महाराष्ट्रातील मंत्र्यांना काहीच समजत नाही, काय सुरू करायचे आणि काय बंद करायचे. त्यांचा ब्रेन लॉक झाला आहे. असेही सुजय विखे पाटील म्हणाले.

अनलॉक आणि लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला टीकास्त्र सोडले आहे. याबाबतचे ट्विट टाईम्स नाव मराठीने केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.