Mulukh Maidan
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

महाराष्ट्रातील जातीयवाद संपवण्यासाठी ठाकरे सरकारने घेतला मोठा क्रांतीकारी निर्णय

Yashoda Naikwade by Yashoda Naikwade
December 3, 2020
in इतर, ताज्या बातम्या, राजकारण, राज्य
0
महाराष्ट्रातील जातीयवाद संपवण्यासाठी ठाकरे सरकारने घेतला मोठा क्रांतीकारी निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील शहरे व ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याचा निर्णय झाला. आता महाराष्ट्रातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार आहेत.

राज्यातील काही वस्त्यांची नावे महारवाडा, बौद्धवाडा, मांगवाडा, ढोरवस्ती, ब्राम्हणवाडा, माळी गल्ली, अशा स्वरुपाची नावे आहेत. ही बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भुषणावह नसल्याने सामाजिक सलोखा आणि सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वाढण्याच्या दृष्टीने ही नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.

या वस्त्यांना आता समता नगर, भीम नगर, ज्योती नगर, शाहू नगर, क्रांती नगर तसेच इतर तत्सम नावे देण्यात येतील. यापूर्वी दलित वस्ती सुधार योजनेच्या नावात बदल करुन त्याऐवजी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे असे करण्यात आलेले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार हे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार असे करण्यात आलेले आहे.

सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवण्याच्या हेतूने हि नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच हेतूने याआधी दलित वस्ती सुधार योजनेचे नाव अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे असे ठेवण्यात आले होते.

राष्ट्रपतींच्या आदेशानुसार अनुसूचित जातींच्या संबोधनाकरिता, सर्व सरकारी व्यवहार, प्रकरणे, प्रमाणपत्र इत्यादींमध्ये “दलित” शब्दाऐवजी इंग्रजी भाषेत “Scheduled Caste & Nav Bouddha” आणि मराठी भाषेत “अनुसूचित जाती व नव बौध्द” या संबोधनाचा वापर करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.

हेमा मालिनी- धर्मेंद्र पुन्हा झाले आजी-आजोबा; घरात एकाच वेळी डबल धमाका

‘एमडीएच’ मसालेचे मालक धर्मपाल गुलाटी यांचं निधन

Tags: Uddhav thackeray उद्धवजातीवाचकनावेबदलणार
Previous Post

हेमा मालिनी- धर्मेंद्र पुन्हा झाले आजी-आजोबा; घरात एकाच वेळी डबल धमाका

Next Post

वाचा रमेश व सीमा देव या सर्वाधिक गाजलेल्या जोडीची लव्हस्टोरी..

Next Post
वाचा रमेश व सीमा देव या सर्वाधिक गाजलेल्या जोडीची लव्हस्टोरी..

वाचा रमेश व सीमा देव या सर्वाधिक गाजलेल्या जोडीची लव्हस्टोरी..

ताज्या बातम्या

‘’मम्मी मेरी शादी करा दो, बच्चा भी पैदा हो जाएगा’’ उतावळा नवरदेव चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल

‘’मम्मी मेरी शादी करा दो, बच्चा भी पैदा हो जाएगा’’ उतावळा नवरदेव चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल

January 24, 2021
‘जय श्रीराम’चे नारे दिल्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदींसमोरच संतापल्या

‘जय श्रीराम’चे नारे दिल्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदींसमोरच संतापल्या

January 24, 2021
“अली अब्बास जफर तुमची अल्लाहची टिंगल करण्याची हिंमत आहे का?”; कंगणा रणौत

“अली अब्बास जफर तुमची अल्लाहची टिंगल करण्याची हिंमत आहे का?”; कंगणा रणौत

January 24, 2021
हसावं की रडावं! सुनेनी केलं भांडण मग सासरा चढला झाडावर; खाली उतरण्यास सांगुनही ऐकेना

हसावं की रडावं! सुनेनी केलं भांडण मग सासरा चढला झाडावर; खाली उतरण्यास सांगुनही ऐकेना

January 24, 2021
दोस्तीत कुस्ती? पूनावालांनी सांगूनही शरद पवारांनी सीरमची लस घेणे टाळले कारण…

दोस्तीत कुस्ती? पूनावालांनी सांगूनही शरद पवारांनी सीरमची लस घेणे टाळले कारण…

January 24, 2021
महाराष्ट्रातील या गावाबद्द्ल तुम्हाला माहिती आहे का; जिथे बेरोजगार शोधुन सापडणार नाय

महाराष्ट्रातील या गावाबद्द्ल तुम्हाला माहिती आहे का; जिथे बेरोजगार शोधुन सापडणार नाय

January 24, 2021
ADVERTISEMENT
  • Mulukh Maidan

Website Maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख

Website Maintained by Tushar Bhambare.