मोठी बातमी: राज्यात कुठल्याही क्षणी लॉकडाऊन होणार? सरकारचा निर्णय झाल्यात जमा

 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून वेगवेगळ्या गाईडलाईन्स आखण्यात आल्या असून काही निर्बंध सुद्धा लादण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन करण्याची शक्यता वाढली आहे.

असे असताना शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी लॉकडाऊन हा उपाय नसला तरी कोरोना संसर्गाची साखळी तोडायला दुसरा उपाय नाही. त्यामुळे उद्या-परवा कडक निर्बंध घालावे लागतील, वेगळा उपाय मिळाला नाही, तर लॉकडाऊनला पर्याय नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता.

आता कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास डॉक्टर आणि नर्सेस आणायचे कुठून? असा प्रश्न पडला असून या प्रश्नाचे ठोस उत्तर मिळत  नाहीये, त्यामुळे राज्यात कुठल्याही क्षणी लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते, अशी माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची मते जाणून घेतली आहे. त्यानंतर संपूर्ण लॉकडाऊन न करता कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखता येईल का? यादृष्टीने विचार सुरू आहे.

टेस्टिंग सेंटर्स, बेडस, रुग्णालय, ऑक्सिजन पुरवठा, या सर्व सुविधा प्रशासनाने वर्षभरात वाढवल्या आहे. त्या आणखी वाढवता येतील, पण रुग्ण वाढले तर डॉक्टर, नर्सेस कुठून येतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे लॉकडाऊनशिवाय कुठलाही पर्याय राज्य सरकारसमोर नाही.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.