राज्यात उद्यापासून कडक लाॅकडाऊन; मुख्यमंत्री जाहीर करणार आणखी कठोर नियम

राज्यभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळ्या गाईडलाईन्स आखत आहे, तसेच राज्यात निर्बंधही लादले आहे.

अशात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकार अनेक मोठ मोठे निर्णय घेतले जात आहे. आता असाच एक मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आता राज्य सरकारने घेतला आहे, याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

राज्यात कोरोनामुळे परिस्थिती बिघडत चालली आहे. त्यामुळे राज्यातील दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर बारावीच्या होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडली होती, त्यावेळी दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. तर बारावीची परीक्षा रद्द केली नसून ती होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

तसेच या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील लॉकडाऊनबाबतही चर्चा करण्यात आली आहे. यावेळी सर्व मंत्र्यांनी राज्यात लॉकडाऊन करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच लॉकडाऊनची घोषणा करणार आहे.

दरम्यान, लॉकडाऊनबाबत असलेली नियमावली तयार करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात कडक लॉकडाऊन लागणार आहे. बस-रेल्वे बंद होणार नाही, त्यामुळे प्रवाशांनी प्रवासासाठी कुठलीही अडचण येणार नसल्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा; राज्यातील दहावीची परीक्षा रद्द, तर बारावीबाबत घेतला ‘हा’ निर्णय
अभिमानास्पद! चिमुकलीला कोणच रक्त देईना, लग्नाच्या मंडपातून उठून जोडप्याने केले रक्तदान
कुंभमेळ्यात पॉझिटिव्ह आलेले १९ भाविक रुग्णालयातून फरार, घटनेने सर्वत्रच खळबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.