त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र फार वेगळा आहे, एकदम 70mm.. केदार शिंदेंची खास पोस्ट व्हायरल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांकडून राज यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ते आपला ५३वा वाढदिवस साजता करत आहेत. कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर त्यांना शुभेच्छा देत आहेत.

अशातच मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी लिहिलेली एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट द्वारे राज ठाकरे यांना शुभेच्छा देताना आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. राज ठाकरेंच्या स्वप्नातला महाराष्ट्र हा फार वेगळा असून एकदा या राजा माणसाच्या हाती महाराष्ट्र राज्य देऊ अशी भावनिक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

तसेच केदार शिंदे यांनी पोस्टमध्ये राज ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या असून, त्यांच्यात असलेल्या गुणांचंही कौतुक केले आहे. राज ठाकरे हा राजा माणूस आहे. तासनतास त्यांच्याशी कलाकार म्हणून संवाद साधू शकतो, त्यांच्याकडे जी माहिती आहे ती आत्मसात करणे फार अवघड आहे असे देखील त्यांनी म्हंटले आहे.

केदार शिंदे पुढे म्हणतात की, वाढदिवस साजरा करून वय वाढत, पण राजसाहेब यंग ॲन्ड डायनॅमिक आहेत. या कोरोनाच्या कठीण परीस्थितीमध्ये हा एकमेव राजकीय नेता होता, ज्याने कितीही विरोधात असला तरी त्याची राजकीय पोळी भाजली नाही. हे आपल्याला सतत जाणवलय. आणि हे मान्य करायालाच हवे. एकच वाटते की, त्यांना त्यांच्या राजकीय क्षेत्रात अजून तशी संधी मिळाली नाही.

त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र हा फार वेगळा आहे. एकदम 70mm.. आपण इतक्या लोकांना संधी दिली.. काहींना न देता गोळाबेरीज करून त्यांनी आपली आपणच मिळवली. तसेच आपण त्यांच्या या वाढदिवसाचे गिफ्ट त्यांना पुढच्या निवडणूकीमध्ये मनसेला मतदान करून देऊ, असेही केदार शिंदेंनी म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.