महाराष्ट्र रेड झोनमध्येच, कोरोनाची दुसरी लाट येणार; ‘या’ लोकांपासून झपाट्याने पसरतोय कोरोना

मुंबई | भारतात कोरोनाने थैमान घातलेले असताना महाराष्ट्राला कोरोनाचा धोका जास्त आहे असे आढळून आले आहे. काही ठिकाणी कोरोना आटोक्यात आला आहे पण काही जिल्ह्यांमध्ये कोरोना अजूनही हाहाकार माजवत आहे.

दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, नाशिक, नांदेड, उस्मानाबाद, बीड, अमरावती, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, पालघर, जळगाव, औरंगाबाद या जिल्ह्यांमधील कोरोना रूग्णांची संख्या १ हजवर ते २५ हजारांपर्यंत आहे.

या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या लाटेची भीती सर्वात जास्त आहे. यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील म्हणाल्या आहेत. या सर्व जिल्ह्यातील लोकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच छोटे व्यावसायिक, घरगुती सेवा पुरवठादार, वाहतुक पुरवठादार, मजूर आणि आवश्यक सेवा देणारे शासकीय व निमशासकीय कर्मचारी, होमगार्ड यांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त वाढण्याचा धोका आहे.

यामुळे त्यांचे सामूहिक सर्वेक्षण करून सगळ्यांची कोरोना टेस्ट करण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र अजूनही रेड झोनमसध्ये आहे. तसेच अनलॉकनंतर बाजारपेठांमध्ये लोकांची गर्दी वाढत चालली आहे. सणासुदीच्या काळात लोक गर्दी करू लागले आहेत.

१९१८ मध्ये स्पॅनिश फ्लूची दुसरी लाट ६ महिन्यांनंतर आली होती. अनेक जण यामध्ये मृत्युमुखी पडले होते. या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा, सॅनिटाईझरचा वापर करावा. असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

अखेर सौरभ गांगुलीने सांगीतले रोहीतला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून वगळण्याचे खरे कारण..

आता धोनी मुंबईकर होणार; मुंबईत घेतलं नवीन घर, साक्षीने शेअर केले फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.